पहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 08:56 PM2021-01-27T20:56:22+5:302021-01-27T20:56:22+5:30

दहा महिन्यांचा खंड : पाचवी ते आठवीच्या १९७८ शाळा सुरू

Attendance of 82966 students on the first day | पहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी

पहिल्या दिवशी ८२९६६ विद्यार्थ्यांची हजेरी

Next

जळगाव : तब्बल दहा महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी ३ लाख ३४ हजार ८६२ विद्यार्थ्यांपैकी ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या २ हजार ५८ शाळांपैकी बुधवारी पहिल्या दिवशी १९७८ शाळा सुरू होवून ८२ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून व त्यांचे तापमान मोजून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र सुध्दा विद्यार्थ्यांकडून गोळा करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनी एक दिवसाआधी वर्गांमध्ये निर्जुतुकीकरण फवारणी करून वर्ग स्वच्छ केले होते. बुधवारी मोठ्या आनंदात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिण भेटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेह-यावर सुध्दा आनंद झळकत होता.

- पहिल्या दिवशी उपस्थिती
विद्यार्थी - ८२९६६
शिक्षक - ११९६९
शाळा सुरू - १९७८


पहिला दिवस मज्जेचा
तब्बल दहा महिन्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी शाळेत प्रवेश केला. त्यामुळे खूप दिवसांपासून मित्र-मैत्रिण न भेटल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.शाळा सुटल्यावर एकमेकांची आरोग्याबाबत विचारणा करताना सुध्दा चिमुकले विद्यार्थी दिसून आले.

८० शाळा उघडल्याच नाही...
जिल्ह्यात २०५८ शाळांपैकी १९७८ शाळा उघडल्या.मात्र, ८० शाळा पहिल्या दिवशी उघडल्याच नाही.प्राथमिक विभागातंर्गत ११९२ पैकी ११८५ तर माध्यमिक विभागातंर्गत असलेल्या पाचवी ते आठवीच्या ८६६ शाळांपैकी ७८९ शाळा सुरू सुरू झाल्या आहेत़ तसेच माध्यमिक विभागातंर्गत येणाऱ्या शाळांमधील ६ हजार ११४ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.आतापर्यंत ३ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटीव्ही आढळून आला आहे.

Web Title: Attendance of 82966 students on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.