नोकरीच्या शोधात चार हजार बेरोजगार युवकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:43+5:302021-08-27T04:21:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चोपडा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कहरामुळे ज्या नोकऱ्या होत्या, त्याही हिरावल्या गेल्या आणि लाखो ...

Attendance of four thousand unemployed youth in search of jobs | नोकरीच्या शोधात चार हजार बेरोजगार युवकांची हजेरी

नोकरीच्या शोधात चार हजार बेरोजगार युवकांची हजेरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कहरामुळे ज्या नोकऱ्या होत्या, त्याही हिरावल्या गेल्या आणि लाखो तरुण बेरोजगार झाले. त्याच धर्तीवर चोपडा येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आणि त्यात तब्बल चार हजार युवक नोकरीच्या शोधात उपस्थित राहिले. यावरून सध्या रोजगारीचे किती विदारक चित्र निर्माण झाले आहे ,याचा अंदाज बांधता येईल.

अशाही परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी उपस्थित सर्व बेरोजगार युवकांना नोकरी दिली जाईल. ज्यांनी-ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा सर्व युवकांना टप्प्याटप्प्याने नोकरी दिली जाईल, असा आशावाद दाखविला. कोरोना काळात असंख्य युवक बेरोजगारीचे चटके सहन करीत असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस, चोपडा पीपल्स बँकेच्या सार्वजनिक सेवा ट्रस्ट, भगिनी मंडळ चोपडा, समाजकार्य महाविद्यालय आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील समाजकार्य महाविद्यालयात २६ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नोकरी देण्यासाठी जवळपास ६० कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नोंदणी केलेले चार हजार बेरोजगार युवकांची मुलाखत घेऊन निवड करणार होते. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनीही या मेळाव्यात जे बेरोजगार युवक हजर आहेत. या सर्वांना नोकरी दिली जाईल. आजच्या दिनी जवळपास हजार ते दीड हजार युवकांना नोकरी मिळेल, असा आशावादही त्यांनी दिला.

येथील चोपडा पीपल्स बँकेचे सार्वजनिक सेवा ट्रस्टमार्फत बेरोजगारी दूर व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यातच हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी जाहीर भाषणावेळी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर

अरुणभाई गुजराथी, चंद्रहास गुजराथी, ॲड. रवींद्र पाटील, संजय गरूड, सुमित पवार, गोरख पाटील, गटनेते जीवन चौधरी, मनीषा चौधरी, ॲड. घनश्याम पाटील, शेखर पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष भारती बोरसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ.नरेंद्र शिरसाठ, रमेश शिंदे, अक्रम तेली, आनंदराव रायसिंग, गिरीश पाटील, पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत खैरनार, यशवंत पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर देशमुख, इनरव्हील अध्यक्षा पूनम गुजराथी, विजय दत्तात्रय पाटील, श्यामसिंग परदेशी, नगरसेवक रमेश शिंदे, कृष्णा पवार, नारायण पाटील, प्रवीण गुजराथी, सरचिटणीस अशोक पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी आश्वासन दिले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या सर्व मुलांना दत्तक घेत आहेत. पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन संजय बारी, प्रास्ताविक आशिषभाई गुजराथी यांनी केले. या महोत्सवासाठी शहर अध्यक्ष श्यामसिंग परदेशी, सनी सचदेव, प्रफुल्ल स्वामी, प्रफुल्ल पाटील, मनोज पाटील, नौमान काझी, अकलाग जहागीरदार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Attendance of four thousand unemployed youth in search of jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.