चाळीसगावचे अतुल पाटील ठरले वेले केशरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 07:57 PM2019-03-04T19:57:31+5:302019-03-04T19:58:51+5:30
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील नामांकित पहेलवान व शिवाजी नगर पुणे, रेल्वे स्टेशनचे तिकीट निरीक्षक पहेलवान अतुल पाटील यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील वेले येथे झालेल्या ‘वेले केशरी’ या मानाच्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील पहेलवान समाधान पाटील यांना चितपट करून, मानाची चांदीची गदा व रोख रक्कम ५१ हजार असे बक्षीस मिळविले.
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाकडी येथील नामांकित पहेलवान व शिवाजी नगर पुणे, रेल्वे स्टेशनचे तिकीट निरीक्षक पहेलवान अतुल पाटील यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील वेले येथे झालेल्या ‘वेले केशरी’ या मानाच्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर येथील पहेलवान समाधान पाटील यांना चितपट करून, मानाची चांदीची गदा व रोख रक्कम ५१ हजार असे बक्षीस मिळविले.
या अतुल पाटील यांच्या यशाने जिल्ह्यातील पहेलवान मंडळींमध्ये उत्साह वाढला आहे.
अतुल पाटील यांचे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, जळगाव जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजीव देशमुख, रघुवीर व्यायामशाळेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य सुनील देशमुख, माजी आमदार ईश्वर जाधव, सरपंच संघटनेचे अध्यक्ष किसनराव जोर्वेकर, डॉ.सुनील राजपूत, डॉ.बाविस्कर, आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष आण्णासाहेब कोळी, दीपक पाटील, रांजणगाव पंचायत समिती सदस्य जिभाऊ पाटील, आर.डी.चौधरी, तसेच चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रांजणगाव सायगाव येथील पहेलवान मंडळींनी अभिनंदन केले.