अटवाड्यात परस्पर गटातील दोन महिलांचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:45+5:302021-06-20T04:13:45+5:30

रावेर : तालुक्यातील अटवाडे येथे परस्परविरोधी गटातील दोन महिलांचा विनयभंग करून मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी ...

Atwada molested two women from each other's group | अटवाड्यात परस्पर गटातील दोन महिलांचा विनयभंग

अटवाड्यात परस्पर गटातील दोन महिलांचा विनयभंग

googlenewsNext

रावेर : तालुक्यातील अटवाडे येथे परस्परविरोधी गटातील दोन महिलांचा विनयभंग करून मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका गटाचे तीन तर दुसऱ्या गटाचे दोन अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंगणात बसलेल्या महिलेसह तिचा पती, दीर व सासू यांच्या अंगावर धूळ उडवल्याच्या कारणावरून हटकले असता, मनोज तुकाराम कोळी तसेच गणेश तुकाराम कोळी, चेतन युवराज कोळी व ज्योती गणेश कोळी यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तथा ४३ वर्षीय विवाहितेच्या पायावर बुक्का मारून हात पकडून विनयभंग केला. १६ जून रोजी रात्री ७ : १५ वाजेच्या सुमारास घटना ही घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून विनयभंग, मारहाण, धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटातर्फे ३० वर्षीय विवाहितेने ट्रॅक्टर लावायला जागा नाही तर घेतले कशाला? अशी दांडगाई व शिवीगाळ करून ज्ञानेश्वर रमेश पाटील, प्रमोद रमेश पाटील, गौरव ज्ञानेश्वर पाटील आदींनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व महिलेच्या पाठीवर बुक्का मारून विनयभंग केल्याची घटना १६ जून रोजी रात्री ७ : १५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संबंधित पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपी दोन्ही भाऊ, पत्नी व मुलाविरुध्द विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन डामरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Atwada molested two women from each other's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.