कागदपत्रांसह आॅडिट रिपोर्ट मागविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:44 PM2019-11-15T23:44:15+5:302019-11-15T23:44:51+5:30
जळगाव : आऱ आऱ विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या १६ लाख ८२ हजार ४०० रूपयांची रक्कम शाळेच्या बँक खात्यात न ...
जळगाव : आऱ आऱ विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वसूल केलेल्या १६ लाख ८२ हजार ४०० रूपयांची रक्कम शाळेच्या बँक खात्यात न भरता परस्पर गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी बडतर्फ मुख्याध्यापकांसह आॅडिट रिपोर्ट व इतर महत्वाची कागदपत्रे मागविली आली आहे़ याबाबतचे पत्र आऱआऱ विद्यालयाला प्राप्त झाले आहे़
रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक विजय सखाराम रोकडे यांनी फिर्यादीत नमूद केल्या प्रमाणे, संशयित बडतर्फ मुख्याध्यापक दगडू सुदाम सरोदे, विजया कैलासचंद्र काबरा, भरत रघुनाथ बसेर आणि निर्मला गणेश पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.
या तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे संशयितांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या ५३२ विद्यार्थ्यांकडून प्रत्येक दीड हजार प्रमाणे ७ लाख ९८ हजार रुपये तसेच नवीन प्रवेशीत व मागील वषार्पासून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असे एकूण २ हजार ९४८ विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्रत्येकी ३०० रुपया प्रमाणे ८ लाख ८४ हजार ४०० रुपये अशी एकूण १६ लाख ८२ हजार ४०० रुपयांची वसुली केली आहे.
मात्र, विद्यार्थी व पालकांना घेतलेल्या रकमेची पावती न देता संगनमताने कट कारस्थान रचून ती रक्कम हडप केली.
विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक असताना चौघांनी या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अपहार प्रकरणाचा तपास हा जिल्हापेठचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांना सोपविण्यात आला आहे़ अपहार प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांकडून १२ नोव्हेंबर रोजी तपासात आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे़ त्यामध्ये १० मुद्यांवर आधारित माहिती मागविण्यात आली आहे़