पाणीबचतीसाठी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:25+5:302021-06-05T04:13:25+5:30
पाणी वाचविण्यासाठी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटची स्थापना (एसीडब्ल्यूपी) भुसावळ : पाण्याचा वापर कमी करणे आणि मनुष्यशक्तीमध्ये बचत करण्यासाठी गाड्यांच्या ...
पाणी वाचविण्यासाठी स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांटची स्थापना (एसीडब्ल्यूपी)
भुसावळ : पाण्याचा वापर कमी करणे आणि मनुष्यशक्तीमध्ये बचत करण्यासाठी गाड्यांच्या बाह्य साफसफाईसाठी आता मुख्य आगारांमध्ये ऑटोमॅटिक कोश वॉशिंग प्लांट्स (एसीडब्ल्यूपी) बसविण्यात येत आहेत. एसीडब्ल्यूपीद्वारे वॉशिंग लाइनवर रॅक ठेवताना, कोचची बाह्य साफसफाई केली जाते. एसीडब्ल्यूपी केवळ बाहेरील कोच अधिक प्रभावी आणि कार्यक्षमतेने साफ करत नाहीत, तर अपव्यय टाळून थेट पाण्याची गरजही कमी करतात. वॉटर रिसायकलिंग सुविधांमुळेही पाण्याची आवश्यकता कमी होते. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी एसीडब्ल्यूपी स्थापित केल्या आहेत. मध्य रेल्वेवर ३ स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट (एसीडब्ल्यूपी) असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
एसीडब्ल्यूपीशिवाय सामान्यतः पाण्याचा वापर - प्रति डब्बा १,५०० लीटर तर एसीडब्ल्यूपीसह स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर - प्रति डबा फक्त ३०० लीटर होतो.
पुनर्विनीकरण पाण्याचा वापर - ८० टक्के (२४० लीटर)
ताजे पाणी अतिरिक्त आवश्यक - २० टक्के (६० लीटर)
प्रति कोच शुद्ध पाण्याची आवश्यकता - ६० लीटर.
एसीडब्ल्यूपीसह पाण्याच्या वापरामध्ये निव्वळ बचत - पाण्याच्या वापरामध्ये ९६ टक्के कपात.
पाण्याची अंदाजे वार्षिक बचत- १.२८ कोटी किलोलीटर.
पाण्याचे जतन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग
भारतीय रेल्वे जल संवर्धनास चालना देण्यासाठी विद्यमान धोरणानुसार विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सीस्टम (आरडब्ल्यूएच) उपलब्ध करून देत आहे. २०० चौरस मीटरपेक्षा जास्त रूफटॉप क्षेत्र असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सीस्टम (आरडब्ल्यूएच) प्रदान केली जात आहे. सेवा इमारती, रुग्णालये, स्टेशन इमारती (रिमॉडेलिंग इत्यादी), रेल्वे क्वार्टर, कार्यशाळा / शेड, यार्ड मॉडेलिंग, तसेच रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, नवीन लाइन, गेज रूपांतरण व साइडिंग या सर्व नवीन बांधकामांमध्ये आरडब्ल्यूएच अनिवार्य करण्यात आला आहे.