भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वयंचलित जिने आजपासून होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:15 PM2018-12-19T23:15:49+5:302018-12-19T23:17:37+5:30

भुसावळ ‘रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने १८ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत २० रोजी रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्रवेशद्वाराकडील चारही जिने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Automatic departure from Bhusaval railway station will be operational from today | भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वयंचलित जिने आजपासून होणार कार्यान्वित

भुसावळ रेल्वेस्थानकावर स्वयंचलित जिने आजपासून होणार कार्यान्वित

Next
ठळक मुद्देअप व डाऊनचे चारही जिने अखेर आता होणार सुरू‘लोकमत’ने स्वयंचलित बंद जिन्यांचा विषय लावून धरला होतास्वयंचलित जिने सुरू झाल्याने प्रवाशांची आता टळणार गैरसोय

भुसावळ , जि.जळगाव : ‘रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने १८ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत २० रोजी रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्रवेशद्वाराकडील चारही जिने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डीआरएम आर.के.यादव, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.डॉ.सुनील नेवे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात हे स्वयंचलित जिने कार्यान्वित होतील.
१४ आॅगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये स्वयंचलित अप साईडकडील जिने कार्यान्वित केले होते. त्याच वेळी ‘लोकमत’ने डाऊन चेही जिने कार्यान्वित व्हावे, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. रेल्वे प्रशासनाने डाऊनचेही (उतरण्याचे) जिने ही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानंतर सुरू असलेले अप (चढण्याचे) जिने तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले होते. ‘लोकमत’ने १८ डिसेंबरला 'स्वयंचलित जिने बंद' असे वृत्त प्रसिद्ध करताच याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत दुसऱ्याच दिवशी रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्रवेशद्वाराचे अप व डाऊन हे चारही जिने अखेर २० रोजीपासून कार्यान्वित होणार आहे.
हे स्वयंचलित जिने कार्यान्वित झाल्यास महिला वर्गासह वयोवृद्ध, दिव्यांग, रुग्ण यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विकास कामांमुळे आधुनिक स्थानक म्हणून गणले जाणारे भुसावळ स्थानक स्वयंचलित जिने नसल्याने प्रवाशांची नाराजी होत होती. आता जिने कार्यान्वित झाल्याने ती नाराजी ही दूर होणार असून, गैरसोय ही टळणार आहे. रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांसाठी नवीन पादचारी रॅम, दोन लिफ्ट, जुने जीने तसेच स्वयंचलित जिने अशा एकाच वेळेस स्थानकावर जाण्यासाठी चार पर्याय राहणार आहे. यामुळे स्थानकावर होणारी गर्दी कमी होईल व प्रवाशांना सोयीप्रमाणे स्थानकाबाहेर व येण्यासाठी पर्याय मिळणार आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते २० रोजी सकाळी सात वाजता स्वयंचलित जिन्याचे व रेल्वे मैदानाचे, जॉगिंग ट्रॅकचेही उद्घाटन होणार आहे. रेल्वे मैदानावर सर्व सुविधा असताना एकेकाळी रणजी सामना झालेला या मैदानावर फ्लड लाईटही लावण्यात यावे, अशी अपेक्षा खेळाडूंना आहे.
दरम्यान, पालिकेने रेल्वे प्रशासनाने दिलेली दिव्यांग व रुग्णांसाठी बंद पडलेली बॅटरीवरची कारही कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Automatic departure from Bhusaval railway station will be operational from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.