भुसावळ रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:34 PM2018-12-16T18:34:23+5:302018-12-16T18:36:19+5:30
भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर दोन्ही प्रवेशद्वार जिन्याला लागून असलेले स्वयंचलित जिने बंद पडल्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांचे हाल होत आहेत.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर दोन्ही प्रवेशद्वार जिन्याला लागून असलेले स्वयंचलित जिने बंद पडल्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांचे हाल होत आहेत.
१४ आॅगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेषत: वयोवृद्ध महिलांची गैरसोय टाळावी यासाठी स्वयंचलित जिने चढण्याचे (अप) सुरू केले होते. काही दिवसांनंतर तांत्रिक अडचणीमुळे जिनेदेखील बंद पडले आहेत. रेल्वे प्रशासनाने यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. जिने बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाने चढण्यासाठी अप स्वयंचलित जिने लावले व काही दिवसांनंतर डाऊनचेही स्वयंचलित जिन्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. परंतु वारंवार येणाºया तांत्रिक अडचणीमुळे सुरू असलेले जिनेही आता बंद पडले आहेत.
दोघी स्वयंचलित जिने आठवडाभरात होतील कार्यान्वित
भुसावळ रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सुविधेच्या दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. स्वयंचलित जिने तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. येत्या आठवडाभरात दोन्ही प्रवेशद्वारासमोरील अप-डाऊनचे स्वयंचलित जिने सुरू होतील. तसेच बॅटरीवर चालणाºया गाड्यांमध्येही काय दोष आहे ते काढून तेही प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात येतील.
-आर. के. यादव, डीआरएम, भुसावळ विभाग