जळगाव जिल्ह्यात सरासरी 21 मि.मी.पाऊस
By admin | Published: June 8, 2017 06:02 PM2017-06-08T18:02:26+5:302017-06-08T18:02:26+5:30
जळगाव शहरासह जिल्हाभरात बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात 21.8 मि.मी.पाऊस झाला.
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.8- शहरासह जिल्हाभरात बुधवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात 21.8 मि.मी.पाऊस झाला.
बुधवारी सकाळपासून काहीसा उकाळा जाणवत होता. त्यात संध्याकाळी रिमङिाम पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी पावसाचा वेग वाढला. त्यामुळे जळगाव शहरासह, शिरसोली, दापोरा, वावडदा या गावांमध्ये पावसाचे आगमन झाले. बुधवारी जळगाव तालुक्यात 36.6, जामनेर 2.3, एरंडोल 29.5 ,धरणगाव 49.8, भुसावळ 18.9, यावल 24.0, रावेर 25.6, मुक्ताईनगर 8.2, बोदवड 3.0, पाचोरा 13.7, चाळीसगाव 10.6, भडगाव 4.3, अमळनेर 14.8, पारोळा 36.2, चोपडा 49.9 मिमी असा एकुण 327.5 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी पावसाच्या 21.8 मिमी पाऊस बुधवारी झाला.