नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:04 PM2017-08-04T13:04:35+5:302017-08-04T13:08:24+5:30

एकुलत्या मुलाच्या निधनाच्या विरहाने नैराश्य आलेल्या कोकीळाबाई यशवंत पाटील (वय ६३) या वृध्देने राहत्या घरात  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शुक्रवारी ६ वाजता उघडकीस आली.

avhane yethe mahilechi aatmhatya | नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या

नैराश्यातून महिलेची गळफास घेवून आत्महत्या

Next
ठळक मुद्देआव्हाणे येथील घटना चार महिन्यांपूर्वी तरुण मुलाचा मृत्यूपहाटे ५ वाजता घेतला गळफास

आॅनलाईन लोकमत,

जळगाव दि.४-एकुलत्या मुलाच्या निधनाच्या विरहाने नैराश्य आलेल्या कोकीळाबाई यशवंत पाटील (वय ६३) या वृध्देने राहत्या घरात  गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आव्हाणे ता.जळगाव येथे शुक्रवारी ६ वाजता उघडकीस आली. कोकीळाबाई या घरात एकट्याच राहत होत्या, पतीचे वीस वर्षापूर्वी निधन झाले  आहे. तर आधारस्तंभ असलेल्या मुलालाही चार महिन्यांपूर्वी परमेश्वराने हिरावून घेतल्याने त्यांना प्रचंड नैराश्य आले होते. 

तालुक्यातील आव्हाणे येथे कोकीळाबाई यशवंत पाटील या घरात एकट्याच राहत होत्या. चार महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा विक्रम पाटील यांचे चार महिन्यांपूर्वी  अचानक निधन झाले आहे. मुलाच्या निधनानंतर सून प्रतिभा पाटील यांचे वढोदा ता.चोपडा या ठिकाणी दुसरे लग्न लावून दिले. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्या दुमजली घरात एकट्याच  राहत होत्या. एकुलत्या एक मुलाच्या निधनाच्या धक्कयापासून त्या सावरल्या नसल्याने त्यांना  नैराश्य आले होते. 

पहाटे ५ वाजता घेतला गळफास
कोकीळाबाई या सकाळी नेहमी ५ वाजेपासून उठून नेहमी मंदिरात जातात. मात्र ६ वाजल्यावर देखील त्या घराबाहेर न आल्याने घरासमोर राहणाºया दिपमाला चौधरी यांनी आवाज दिला. तसेच घराचे दार देखील उघडेच होते,  घरातून आवाज न आल्याने दिपमाला यांनी घराचे दार उघडले. त्यांना समोर कोकीळाबाई यांचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी लगेच आरडाओरड केली. त्यानंतर तेथे शेजारच्यांनी धाव घेतली. कोकीळाबाई यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदन  झाल्यानंतर  मृतदेह गावात नेण्यात आला. तेथे  सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: avhane yethe mahilechi aatmhatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.