कुंभारी खुर्द येथे शेत जमिनीची फेरफार होण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:57 PM2017-11-10T17:57:12+5:302017-11-10T18:04:25+5:30
शेतकºयांनी साडे तीन लाखांचा नजराणा भरल्यानंतरही पाच महिन्यांपासून सुरु आहे पायपीट
आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर,दि.१० : कुंभारी खुर्द येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिन खरेदी शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया पूर्ण करीत शेत जमिनीची फेरफार होण्यासाठी जामनेर तहसील कार्यालयाकडून विलंब होत आहे. या जमिनीच्या नजराणापोटी तीन लाख ६० हजारांचा भरणा केल्यानंतरही पाच महिन्यांपासून शेतकºयांची पायपीट सुरुच आहे.
जामनेर तालुक्यातील कुंभारी खुर्द येथील गट नं. ६९/१/१ क्षेत्र १.१९ व ६९/१/२ क्षेत्र ०.८५ आर ही एकाच गटातील जमीन आहे. ही शेत जमीन वाकोद येथील शेतकरी शंकर दांदडे व सुभाष लोढा यांनी शासनाची पूर्व परवानगी घेवून रंगलाल बाबू राठोड व गोपाल रंगलाल राठोड यांच्या कडून रितसर खरेदी केली. मात्र गेल्या पाच महिन्यापासून तोंडापूर तलाठी यांच्या कडून दफ्यावर मालकी हक्कात नाव लावण्यासाठी विलंब होत आहे. नविन अविभाज्य शर्तीची जमीन असलेल्या या शेतीची शासनाची पूर्व परवानगी घेवूनच खरेदी विक्री केली जाते. खरेदीच्या पूर्व परवानगी साठी शासनाकडून नजराना स्वरुपात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये चलन स्टेट बँकेत भरून रितसर दुय्यम निबंधक जामनेर येथे खरेदी केली. खरेदी नंतर ही शेत जमीन मूळ मालकाच्या नावावरून खरेदीदार यांच्या नावावर लावण्यासाठी संबधीत तलाठी यांच्या कडे गेल्या पाच महिन्यांपासून देवून देखील फेरफार नोंद न घेता मालकी हक्कात लावण्यात आलेले नाही.
शासनाला नजराना स्वरुपात लाखो रुपये भरले आहे. नियमा प्रमाणे खरेदी करून मालकी हक्कात दप्तरी नाव लावण्यासाठी तलाठी यांना दिले आहे. मात्र हेतुपुरस्कर विलंब केला जात आहे.
- शंकर दांदडे , शेतकरी
भोगवटा वर्ग २ च्या जमीन खरेदी मध्ये आॅनलाइन थम्ब चा प्रॉब्लम होता. ही समस्या दूर झाली आहे. सद्यस्थितीत नोंद घेण्यास हरकत नाही. संबधित तलाठी यांच्याकडून माहिती घेतो.
-परमेश्वर कासुळे, नायब तहसीलदार, जामनेर
आतापर्यंत या नोंदबद्दल आपल्याकडे काही एक माहित आली नाही.
-एम. डी. मोतिराय, मंडळाधिकारी, तोंडापूर