उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जाणे टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:54 PM2018-04-30T15:54:18+5:302018-04-30T15:54:18+5:30
जळगावातील वाढत्या तापमानामुळे शरीराची लाहिलाही
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३० : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ््याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उन्हासोबत विविध आजारही वाढतात, त्यामुळे ‘आरोग्य सांभाळा...’ असाच सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याच जनजीवनावर परिणाम तर होतच आहे, शिवाय उष्माघाताचीही शक्यता वाढली आहे. यासंदर्भात काळजी घेण्याबाबत सल्ला दिला जात आहे.
उन्हामुळे शरीराचे तापमान वाढण्यासह शरीरातील पाणीदेखील कमी होते. त्यामुळे थोडे जरी कष्टाचे काम केले तर थकवा येतो. इतकेच नव्हे चक्कर येऊन प्रकृतीही खालावते. शरीराचे पाणी कायम ठेवण्यासाठी काळजी घेत शक्यतो अवजड कामे करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हे टाळा
उघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावे
बर्फाचा गोळा ज्या पासून तयार होतो, त्या बर्फाच्या दर्जाची शाश्वती नसते, त्यामुळे बर्फाचे गोळे खावू नये.
सकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये
जीन्स, घट्ट कपडे यांचा वापर टाळावा, आजारी मुलांना शाळेत पाठवू नये
आहारामध्ये उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.
अशी घ्या काळजी
भरपूर पाणी प्या, फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खा
इलेक्ट्रॉल पावडर, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे यांचेही सेवन करावे.
घर, कार्यालय व कामाच्या ठिकाणी कोठेही थंड वातावरण राहण्यासाठी कुलरचा वापर करा
बाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमालअवश्यबांधा
शक्यतो बाहेरची कामे सकाळीच करून घ्यावी
सुती व मोकळ््या कपड्यांचा वापर करा