लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

By admin | Published: January 25, 2017 12:40 AM2017-01-25T00:40:45+5:302017-01-25T00:40:45+5:30

मन्याड : आवर्तनाच्या आत कॅनॉल लिकेज बंद केल्याने शेतक:यांना झाला लाभ

Avoid millions of liters of water | लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

लाखो लीटर पाण्याची टळली नासाडी

Next

आडगाव ता. चाळीसगाव : मन्याडच्या  कॅनॉलचे मोठय़ा प्रमणावर असलेले लिकेज बंद झाल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी थांबली आहे. आवर्ताच्या आत हे काम झाल्याने याचा फायदा परिसरातील शेतक:यांना मिळाला आहे.
‘लिकेजचे ग्रहण’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ ने दोन वर्षापूर्वी प्रत्यक्ष सव्र्हे करुन वृत्तमालिका लावली होती. त्याची पाटबंधारे विभागाने दखल घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. यासाठी  आमदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा करुन शासनाकडून  99 लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्यात पाटबंधारे विभागाने टप्प्याटप्प्याने  नांद्रे ते अलवाडीर्पयत सर्व लिकेज काँक्रीटीकरण करुन बंद केले तर काही मो:यांची तसेच गेटची दुरुस्ती करीत प्रत्येक चारीला क्रमांक किती, त्यावर भिजणारे क्षेत्र किती, तिची वहन क्षमता किती असा उल्लेख असणारे बोर्ड लावले. उर्वरित अलवाडीपासून ते तळोंदार्पयत  लहान मोठे लिकेज बंद केले तर अजून अधिक फायदा होईल.
धरण निर्मितीपासून होती समस्या
स्व.रामराव जिभाऊ यांच्या प्रयत्नाने मन्याड नदीवर नांद्रे गावाजवळ चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील सीमेवर 1973 मध्ये धरण कामास सुरुवत झाली. कमी खर्चात व कमी कालावधित  धरण पूर्ण झाले. 1974 मध्ये धरण कार्यान्वित झाले. मन्याड परिसरतील  22 गावांना अमृत संजीवनी मिळाली. धरण निर्मितीपासून ते आजर्पयत  42/43 वर्षाच्या कालावधीत कॅनॉलची स्थिती भक्कम होती. 20-22 वर्षापासून कॅनॉलची स्थिती बिघडली. त्यामुळे नांद्रे-अलवाडीर्पयत पाणी गळती होत राहिले. दोन वर्षापूर्वी लोकमतने प्रकाशझोत टाकल्यावर पाटबंधारे विभागाने सर्व पाणीगळती बंद केली.
पूर्वी 50 टक्के पाणी वाया जायचे
पूर्वी धरणातून 100 क्यूसेस पाणी सोडल्यास आडगाव-उंबरखेड-देवळी- चिंचखेडे या गावाना 50 टक्के म्हणजे 50 क्यूसेस् पाणी सिंचनासाठी मिळायचे.  लिकेज बंद केल्यामुळे पाटबंधारे विभागाने आता धरणातून 80 क्यूसेस पाणी सोडले तरी 5-10 टक्के वगळता जवळपास 70 ते 75 क्यूसेस पाणी वरील गावातील विशेष करुन आडगाव-उंबरखेड येथील शेतक:यांना मिळाल्याचा अनुभव आला. शिवाय पाण्याचा प्रवाहदेखील  15-20 कि.मी.र्पयत   प्रवाह  सारखा असल्याने शेतक:यांना पाणी घेणेही सोयीचे झाले.
अनधिकृत पाणी वापरावर
पाटबंधारे विभागाची नजर
मन्याड धरणातून नुकतेच चारी क्र. 10 व 11 ला पाणी सोडले गेले. वरील दोन्ही चारीवरील  लाभधारक  शेतक:यांनी आपले पाण्याचे अर्ज थकबाकीसह भरुन पाटबंधारे विभागाला सहकार्य केले.  परंतु ज्यांनी वेळकाढूपणा करुन अनधिकृत पाणी वापर करण्याचा प्रकार केला त्या शेतक:यांच्या शेतीचा पंचनामा  पाणी अर्ज भरुन घेतले. हा निर्णय काही शेतक:यांना समाधानकारक वाटला तसेच अनेक शेतक:यांनी   कॅनॉल गळती बंद करण्यामागे लोकमतचा सिंहाचा वाटा असल्याने लोकमतचे आभार मानले.
पाण्याचे नियोजन करावे
पाटबंधारे विभागाने नुकतेच मन्याड धरणातून पहिले आवर्तन सोडले.  पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास एखादे आवर्तन वाढू शकते.  अशा रितीने पाटबंधारे विभागाने नियोजन केल्यास शेतक:यांना उन्हाळी बाजरी  मका ही पिके पूर्ण क्षमतेने घेता येतील.  यासाठी शेतक:यांनीदेखील पाटबंधारे विभागाला सहकार्य करुन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
मन्याड धरणावर शेकडोच्या वर पाणी उपसा सिंचन  बसवले असून याद्वारे धरणाची जलपातळी लवकर  खालावत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने नवीन लिफ्टला परवानगी देऊ नये, तसेच  ज्यांना परवानगी मिळाली आहे  त्यांच्या पाणी वापरावर निर्बंध  घालावे अशी मागणी जवळपास 18 गावातील शेतक:यांनी केली आहे.लिफ्टला (पाणी उपसा योजनेला) अशाच परवानगी मिळाल्या तर   बेसुमार पाणीउपसा होऊन भविष्यात अनेक गावांना यापुढे पाणी मिळणे कठीण होईल. यात आडगाव-शिरसगाव- टाकळी- देवळी-चिंचखेडे- डोणदिगर या गावाचे जास्त नुकसान होईल यासाठी  यापुढे पाटबंधारे विभागाने  तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी देऊ नये अशी मागणी वरील गावातील शेतक:यांनी केली आहे.

Web Title: Avoid millions of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.