हद्दीच्या वादातून मृत्यूची नोंद करण्यास टाळाटाळ
By admin | Published: April 6, 2017 12:31 AM2017-04-06T00:31:12+5:302017-04-06T00:31:12+5:30
पोलिसांची दिरंगाई : महावितरणच्या मृत कर्मचाºयाच्या नातेवाईकांची फिरवाफिरव
जळगाव : महावितरण कंपनीत कार्यरत असलेल्या जितेंद्र लक्ष्मण पाटील (४५)रा़ शंकरअप्पानगर, पिंप्राळा यांचा बुधवारी कामावर दुपारी १२ वाजेच्या सुमारास हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला़ मृत्यूनंतर नोंदीसाठी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रामानंदनगर, जिल्हापेठ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वारी करण्याची वेळ आली़ पोलिसांनी हद्दीचा वाद निर्माण केल्याने तब्बल दोन तासानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली़
जितेंद्र पाटील हे सकाळी ९ वाजेच्या नेहमीप्रमाणे एमआयडीसीतील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले़ साफसफाईचे काम केले यानंतर त्यांना दुपारी ११़३० वाजता मळमळ होवून उलटी झाली़ अचानक प्रकृती बिघडल्याने भास्कर मार्केट परिसरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़
जितेंद्र यांचे वडील लक्ष्मण पाटील यांचा दहा ते बारा वर्षांपूर्वी कामावर असताना अपघाती मृत्यू झाला होता़ त्यांच्या जागी २०१२ मध्ये जितेंद्र पाटील नोकरीवर लागले होते़ त्यांच्या पश्चात याचा आई मिराबाई, दोन भाऊ मनोज व विनायक, पत्नी, मुलगा पियुश व मुलगी पूजा असा परिवार आहे़ पियुष १ लीत व पूजा ही ९ वीत आहे़ जितेंद्र यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार झाले़
हद्दीच्या वादामुळे नातेवाईकांची फिराफिर
जितेंद्र पाटील यांचा दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ त्यांच्या मृत्यूच्या नोंदीसाठी नातेवाईकांसह त्यांच्या परिसरातील नागरिकांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले़ याठिकाणी त्यांना एमआयडीसी परिसरात ड्युटीवर असताना घटना घडल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले़ एमआयडीसी ठाण्यात पोहचल्यावर ते पिंप्राळा येथील रहिवासी असल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला़ रामानंदनगर येथे पोहचल्यावर कर्मचाºयांनी जिल्हापेठ हद्दीतील खाजगी रूग्णालयात मृत्यू झाल्याने त्या ठिकाणी जाण्यास सांगितले़ अशा प्रकारे दोन तास फिराफिर झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय गाठले़ याठिकाणी पोलीस कर्मचाºयांसोबत शाब्दीक चकमक उडाली़ यानंतर दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.