घर खरेदीस टाळाटाळ, दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 02:58 PM2019-06-20T14:58:40+5:302019-06-20T14:59:02+5:30
चोपडा : येथे मधुबन नगरातील घराची सौदेपावती करून देऊन वर्ष लोटले तरीही खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा ...
चोपडा : येथे मधुबन नगरातील घराची सौदेपावती करून देऊन वर्ष लोटले तरीही खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, भोईवाड्यातील लताबाई अशोक खैरनार यांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मधुबन नगरातील गट क्रमांक १०३०, प्लॉट क्र. २१ चा सौदा प्लॉटच्या मालक मानीषा मनोज देशमुख व लोटन रमेश देशमुख, रा. अरुणनगर यांच्याकडून १३ लाख ५१ हजार रुपयांत केला. यापोटी त्यांना २ लाख ५० हजार रुपये रोख व ४५००० रुपये बँकेत भरणा करून एकूण २९५००० रुपये दिले आहेत. मात्र, त्यानंतर वर्ष लोटले तरी घराचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करणाºया मानीषा मनोज देशमुख व लोटन रमेश देशमुख, रा. अरुणनगर, चोपडा यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात लता अशोक खैरनार यांच्या फियार्दीवरून भाग ५, भादंवि ४२० व ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रदीप राजपूत करीत आहेत.