यावल तालुक्यातील आमोदे येथे घ.का.विद्यालयात पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 05:05 PM2019-01-05T17:05:49+5:302019-01-05T17:06:33+5:30
फैजपूर , जि.जळगाव : आमोदे, ता.यावल येथील घनश्याम काशिराम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व ...
फैजपूर, जि.जळगाव : आमोदे, ता.यावल येथील घनश्याम काशिराम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ सेवकराम भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
याप्रसंगी प्रा.आंधळे यांनी मुलांना संबोधून अभिरुचीची साधना हाच प्रगतीचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. क्रिकेटची साधना सचिन तेंडुलकर यांनी केल्याने जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं, गायकीची साधना करून लतादीदींनी आपलं नाव गानसम्राज्ञी म्हणून सातासमुद्रापार नेले, आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करा, त्याची मनोभावे साधना करा म्हणजे प्रगतीची मोठी कमान कर्र्तृत्वाने तुम्ही निर्माण करू शकता. कोणतीही कला आपल्याला ओळख देत असते. ओळख देत नाही तर भाकरी आणि नोकरीही देत असते. वर्तमानात तुमचे कौशल्य तुम्हास कामी येणार आहे, असे सांगत त्यांनी स्वानुभवावर जोर देत स्वत: केलेली कवितेची साधना आणि त्यापासून मिळालेले यश सांगताना विद्यार्थी व शिक्षक वृंद भारावून गेले.
साहित्यिक काशिनाथ भारंबे यांनीही मुलांना मोलाचा संदेश देत ध्येय निश्चितीचा मंत्र दिला.
व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र ओंकार चौधरी, चेअरमन विवेक भाऊ लोखंडे, चिटणीस महेंद्र सरोदे, संचालक, मुख्याध्यापक एम.पी.सोनवणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी वैभव किरण वारके व मुलींमधून प्रथम वैष्णवी सुनील पाटील तसेच शाळेतील सर्व गुणवंतांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक एम .पी. सोनवणे यांनी केले. बक्षीस वाचन जे.व्ही. वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन एस.बी.बोठे यांनी केले. पी.एस.पाटील यांनी आभार मा