चाळीसगाव येथे आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 07:55 PM2019-01-18T19:55:30+5:302019-01-18T19:56:56+5:30
चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव, जि.जळगाव : आजच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाण फार कमी झाले आहे, कारण त्याची जागा मोबाइल आणि इंटरनेटने घेतली आहे, तंत्रज्ञानाचा वापर आपण अवश्य केला पाहिजे, कारण तंत्रज्ञानाने जगात फार मोठी क्रांती घडवली आहे, परंतु वाचन आणि लिखाणसुद्धा आवश्यक आहे की, ज्याने आपल्या ज्ञानात निश्चित भर पडेल. कारण तुमचे ज्ञान हे वैविध्यपूर्ण असले पाहिजे. तसेच तुमच्याजवळ जर शोध असेल असेल तर जगातल्या कोणत्याही स्पर्धेला तुम्ही तोंड देऊ शकाल, असे प्रतिपादन धुुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सूर्यवंशी यांनी येथे केले.
चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. डी . एस. सूर्यवंशी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम बी. पाटील होते. मिलिंद देशमुख, डॉ.विनोद कोतकर, योगेश अग्रवाल, राजू चौधरी , क.मा.राजपूत, अॅड. प्रदीप अहिरराव, प्राचार्य डॉ. बिल्दीकर, प्रा.उंदीरवाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या २६ वर्षांपासून ही स्पर्धा अविरत सुरु आहे, असे प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्पर्धेविषयी दामिनी फडे, धुळे व अस्मिता झोपे, जळगाव यांनी मनोगत व्यक्त केले
सदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रुपये ३५०० व फिरता चषक- पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक महाविद्यालय शहादा, दुसरे पारितोषिक रु. ३००० हे सरदार एस.के. पवार जुनिअर कॉलेज नगरदेवळा, तिसरे पारितोषिक रु. २५०० हे बी. पी. आर्टस एस.एम ए सायन्स के. के. सि कॉमर्स कॉलेज चाळीसगाव तर उत्तेजनार्थ पारितोषिक हे जी. डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव यांना मिळाले
सूत्रसंचालन प्रा. डी. एल.वसईकर यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. ए व्ही काटे यांनी मानले.