किरण पाटील यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:13+5:302021-02-07T04:15:13+5:30
सीआयटीयूच्या कार्यालयाचे आज उद्घाटन जळगाव : जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या (सीआयटीयू)च्या कार्यालयाचे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती ...
सीआयटीयूच्या कार्यालयाचे आज उद्घाटन
जळगाव : जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या (सीआयटीयू)च्या कार्यालयाचे ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात बी.विंगमधील दुकान नंबर १६ येथे उद्घाटन करण्यात येणार आहे, तरी बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमोद सांगळेंचा गौरव
जळगाव : जळगाव येथील रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस कर्मचारी प्रमोद सांगळे रेल्वेतील विविध प्रलंबित गुन्ह्याचा छडा लावून, उत्कृष्ट कामगिरी बजावली. याबद्दल त्यांचा डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी सपत्नीक प्रमोद सांगळेंचा प्रशस्तिपत्र व दोन हजार रोख देऊन गौरव केला. जळगाव विभागात यंदा सांगळे यांनीच उत्कृष्ट कामगिरीचा किताब पटकाविल्यामुळे, त्यांचा रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त क्षितिज गुरव, जळगाव स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनीही सत्कार केला.
रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी
जळगाव : नवीन बस स्थानकासमोर जादा प्रवासी मिळण्यासाठी अनेक रिक्षा चालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करीत असल्यामुळे, दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकानांही अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे, तरी पोलीस प्रशासनाने या रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात स्वच्छता करण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेसमोरील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात अनियमित साफसफाई अभावी मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. यामुळे उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरी मनपा प्रशासनाने या उद्यानाची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.