डॉ.धर्मेंद्र पाटील यांना पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:30 PM2019-10-25T12:30:28+5:302019-10-25T21:48:48+5:30
जळगाव : सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेला पुरस्कार नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांना ...
जळगाव : सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेला पुरस्कार नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. नागपूर येथे झालेल्या मॉस्कोन २०१९ या राज्य नेत्ररोग तज्ज्ञांच्या परिषदेत हा पुरस्कार डॉ.पाटील यांना प्रदान करण्यात येणार आला.
डॉ. पाटील हे गेल्या दशकापासून काश्मिरातील सीमारेषेवर वैद्यकीय सेवा, काश्मीरमधील जनतेचे मन परिवर्तन करण्याचे सामाजिक कार्य तसेच महाराष्ट्रातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी करीत असलेली मदत तसेच महाराष्ट्रातील आजवर झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मदत, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांच्या संस्थेकडून होत असलेली मदत, गोरगरिबांना प्रसंगी मोफत उपचार अशा आजवरच्या विविध सामाजिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार राज्यभरातील नेत्ररोगतज्ज्ञांच्या उपस्थित देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.गोपाल अरोरा, सचिव आनंद पांगारकर, शास्त्रीय समितीचे चेअरमन डॉ. प्रीतम सावंत, खासदार डॉ.विकास महात्मे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ.एस. नटराजन, डॉ. महिपाल सचदेव उपस्थित होते. डॉ. पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराचे विविध सामाजिक संस्था, संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात येत आहे.