अलवाडी येथे डेंग्यू दिनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:58+5:302021-05-27T04:16:58+5:30
अलवाडी, ता. चाळीसगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगावअंतर्गत उपकेंद्र, पिलखोड, गाव अलवाडी येथे डेंग्यू दिन साजरा करून डेंग्यू आजाराबाबत ...
अलवाडी, ता. चाळीसगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगावअंतर्गत उपकेंद्र, पिलखोड, गाव अलवाडी येथे डेंग्यू दिन साजरा करून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सैनी व पिलखोड येथील आरोग्य सेवक हेमंत पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, हिवताप पर्यवेक्षक लूकराम तडवी, भागवत देवरे, हमीद पठाण व शिरसगाव येथील आरोग्य सहाय्यक संजय निकुंभ, सुरेंद्र शितोळे व व वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार राठोड, डॉ. सय्यद मुस्तक यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.
आरोग्य सेवक हेमंत पवार, आशा स्वयंसेविका बेबीबाई बिराढे यांनी ग्रामस्थांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाण्याचा हौद, टाक्या घट्ट झाकणे, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, मच्छरदाणी वापर या उपायांबाबत मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी शपथ दिली. या कार्यक्रमास आरोग्यसेवक हेमंत पवार, डॉ. सुरेश सैनी, गटप्रवर्तक सुवर्णा पाटील, आशा स्वयंसेविका तसेच अलवाडी सरपंच प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभले.