अवयवदानाविषयी आता विद्यार्थ्यांमध्येही जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:13 PM2018-08-04T15:13:19+5:302018-08-04T15:13:54+5:30

सुखद : इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात यंदा केलाय धड्याचा समावेश

Awareness about the organism now in the students | अवयवदानाविषयी आता विद्यार्थ्यांमध्येही जागृती

अवयवदानाविषयी आता विद्यार्थ्यांमध्येही जागृती

Next


चाळीसगाव, जि.जळगाव : अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्य पातळीवर अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येत होती. परंतु आता राज्य शासनाच्या इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग २ च्या पुस्तकाच्या पान क्रमांक ९० वर अवयवदान तसेच देहदान यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. अवयव दानाचे महत्त्व शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांना कळावे यासाठी दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदानाचा धडा समाविष्ट करण्यात आला असून, देहदानाचीदेखील माहिती यात देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होण्यास मदत होईल.
यंदाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नव्या अभ्यासक्रमात शब्द संपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण क्षमता, निर्णय क्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग- व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे.
विज्ञानाच्या पुस्तकातून अवयव दानाचे महत्त्व आणि अवयव दान कशा पद्धतीने करता येते याची माहिती या धड्याच्या माध्यमातून मिळणार आहे. देशात अवयवदानाचे महत्त्व आणि माहिती घराघरात पोहोचावी, अवयवदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने अवयवदान, देहदान, आणि अवयव प्रत्यारोपण विषयाची माहिती देणारा पाठ समाविष्ट केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच मुलांना अवयवदानाची माहिती मिळणे शक्य होणार आहे.

काय आहे नेमके धड्यात?
अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय?
अवयव प्रत्यारोपण करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे?
लोकांचा जीव वाचविण्यासाठी अवयवदान का महत्त्वाचे आहे?
देहदान म्हणजे काय? याचा वापर संशोधनासाठी कसा केला जातो?
अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?

देहदान आणि अवयवदानाबाबत आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. अवयवदानाबाबत राज्य शासन जनजागृती मोहीम हाती घेत असली तरी याबाबत लोकसहभाग वाढणेही आवश्यक आहे. तसेच अवयवदानाची माहिती शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे.
- किशोर शिरोडे, शिक्षक, आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल, चाळीसगाव, जि.जळगाव

Web Title: Awareness about the organism now in the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.