अंनिसकडून व्यसनापासून लांब राहण्यासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:03+5:302021-01-03T04:17:03+5:30
०३ सीटीआर २६ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद जळगाव यांच्यासह सामाजिक ...
०३ सीटीआर २६
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मराठी विज्ञान परिषद जळगाव यांच्यासह सामाजिक संस्थांच्यावतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला ''''द'''' दारूचा नव्हे ''''द'''' दूधाचा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना दूधाचे वाटप करून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहर शाखेचे कार्यकर्ते शिरीष चौधरी यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा दिलीप भारंबे यांनी व्यसनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याची माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर प्रा.कट्यारे यांनी मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे, प्रा.आर.ए. पाटील, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते, नेहरू चौक मित्र मंडळाचे रिकेश गांधी, आर.एस.चौधरी, विश्वजीत चौधरी, अक्षय सोनवणे, शक्ती महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
०००००००००००००००
०३ सीटीआर २८
दारू नको, दूध घ्या
जीवनज्योती व्यसनमुक्ती उपचार व मार्गदर्शन केंद्रांच्यावतीने नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू, तंबाखू तसेच बीडी, सिगारेट आदी व्यसनाला दफन करीत दारू नको, दूध घ्या हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारूती पोटे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, डॉ. बाळासाहेब कुमावत, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. एस.जी.बडगुजर, मुकूंद गोसावी, डॉ. मेहुल पटेल, डॉ. प्रीतम कुमावत आदींची उपस्थिती होती.