गुलाबी बोंड अळींच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:29 PM2020-09-02T19:29:10+5:302020-09-02T19:29:21+5:30
जळगाव : कापुस पिकावर येणाऱ्या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये गेल्या चार ते पाच वर्षात बीटीसाठी प्रतिकार शक्ती ...
जळगाव : कापुस पिकावर येणाऱ्या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये गेल्या चार ते पाच वर्षात बीटीसाठी प्रतिकार शक्ती निर्माण झाली असून गुलाबी बोंडअळी ही कोणत्याही वाणाची बीटी कपाशी सहजरित्या पचऊ शकते. त्या अळीस बोंडात जाण्याच्या आधीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागातर्फे चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
तीन चित्ररथांद्वारे जळगाव जिल्ह्यात जनजागृती सुरु करण्यात येत आहे़ चित्ररथ २५ दिवसासाठी फिरणार आहेत व गावोगावी जाऊन चित्ररथाव्दारे व ध्वनीफितीव्दारे जनजागृती करणार आहे. महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी या चित्ररथासोबत जनजागृती करुन प्रत्येक गावात पोस्टर बॅनर लावणार आहे.
शेतकºयांना केले मार्गदर्शन
मास आॅडिओ ब्रीज या तंत्रज्ञानाचा वापर करुन एकाच वेळी २ हजार ३५८ दुकानदार व ४ हजार ५०० शेतकरी यांच्याशी कृषी विभागाने संपर्क साधला. यामध्ये एक ते दोन व्यक्ती बोलू शकतात व दहा हजार लोकांना एकाच फोन मध्ये ऐकू जाते. या उपक्रमातंर्गत २९ आॅगस्ट रोजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी गुलाबी बोंडअळीबद्दल मार्गदर्शन केले.