“ सायकल राईड ” मधून जनजागृतीचे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:47+5:302021-01-01T04:11:47+5:30

जळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एका आगळ्या वेगळ्या अशा अलविदा 2020 सायकल राईड ” चे जिल्हा नियोजन अधिकारी ...

Awareness message from "Cycle Ride" | “ सायकल राईड ” मधून जनजागृतीचे संदेश

“ सायकल राईड ” मधून जनजागृतीचे संदेश

Next

जळगाव : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एका आगळ्या वेगळ्या अशा अलविदा 2020 सायकल राईड ” चे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी आयोजन केले होते. या माध्यमातून सहभागी सर्व सायकलपटूंनी विविध जनजागृतीपर संदेशही दिले आहे. व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून हे सर्व नियोजन करण्यात आले होते.

सर्वांना सकाळी साडेसहा वाजता गणपती नगर येथील गणपती मंदीर येथे जमावे व तेथून १८ किमी अंतरावर असलेल्या रामदेव टेकडीपर्यंत सायकलींग करत यावे. तसेच नवीन वर्षानिमीत्त जो संदेश द्यायचा आहे, त्याचे पोस्टर तयार करा व सायकलसोबत टेकडीवर संदेश द्या असे सांगण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत १८ ते २० सायकलिस्ट मित्रांनी यात सहभाग नोंदविला. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा ,सायकल चालवा व रोग प्रतिकारक शक्ती वाढवा, कोरोनाला पळवा, असे विविध संदेश देण्यात आले. यात धनंजय येरुळे, रुपेश महाजन, चंदर तेजवाणी, प्रा. दीपक दलाल, डॉ. मनोज पाटील, डॉ. विजय घोलप, सुनिल चौधरी, विशाल आंधळे, मोतीलाल पाटील, अतुल सोनवणे, इरफान पिंजारी, मुर्गांक निशाणदार, मयुर जैन, कामिनी धांडे, डॉ. अनघा चोपडे, स्नेहा लुनिया आदी सहभागी झाले होते.

Web Title: Awareness message from "Cycle Ride"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.