मतदान केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करीत विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:06 PM2019-10-21T13:06:22+5:302019-10-21T13:06:56+5:30
जळगाव : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी यंदा तरुणाई मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेºहावरचा ...
जळगाव : लोकशाहीच्या उत्सवात मतदान करण्यासाठी यंदा तरुणाई मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईच्या चेºहावरचा आनंद काही वेगळाच होता. सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावला येतांना, पाचोºयाहून ५ ते ६ विद्यार्थी बसले. मतदानानिमित्त महाविद्यालयाला सुट्टी असली, तरी हे विद्यार्थी क्लासला जळगावला जात होते.
यावेळी या विद्यार्थ्यांमध्ये, मतदानाचा हक्क बजावल्याची जोरदार चर्चा रंगली होती. एका विशाल नावाच्या विद्यार्थ्यांने आपल्या मित्रांनी सांगितले की, सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर जाऊन मतदान हक्क बजावला. गेल्या महिन्यात नाव नोंदविल्यानंतर या विधानसभेला यादीत नाव आल्यामुळे खुप आनंद झाला होता. आज प्रत्यक्षात मतदान केल्याचा खुप अभिमान झाला असल्याचे विशाल मित्रांना सांगित होता.
यावेळी विशालसह त्यांच्या प्रवीण नावाच्या मित्रानेही मतदान करुन,धावपळ करुन महाराष्ट्र एक्सप्रेस पकडली असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये मतदानावर चांगलीच चर्चा होऊन, सर्व विद्यार्थी फेसबुक व आपल्या विविध व्हाट्स अॅप ग्रुपवर मतदान केल्याचे फोटो पोस्ट करतांना दिसून आले.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी तर व्हॉट्सअॅपच्या डिपीलादेखील मतदान केल्याचे ठेवतांना दिसून आले.