अपघात रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:35+5:302021-07-24T04:12:35+5:30
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, अद्यापही बहुतांशी वाहनचालकांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती नाही. यामुळे रस्ता सुरक्षा ...
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, अद्यापही बहुतांशी वाहनचालकांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती नाही. यामुळे रस्ता सुरक्षा अभियान सालबर्डी व पिंपरी या दोन्ही गावांत घेण्यात आले. यानिमित्त पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
गावामध्ये महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तरी गावाजवळ अपघात जंक्शन असल्यामुळे वाहतूक करणे अवघड झाले आहे, म्हणून या कार्यक्रमातून गावामध्ये जनजागृतीचे काम करण्यात आले आहे. मोटारसायकल वाहतूक, फोरव्हीलर चालक व ट्रकचालक यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी पथनाटकाचा उपयोग करून गावात जनजागृतीचा कार्यक्रम करण्यात आला आहे. यात वेलस्पन कंपनीमार्फत नम्रपाली गोंडाने, संतोष यादव वेदवीरसिंग, उमेश राठोड, रामकृष्ण बोथा उपस्थित होते. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला, मुली व मुले उपस्थित होते. रस्ता वाहतुकीची नियमावली नागरिकांना वाटण्यात आली.