योगावर जनजागृतीसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:44+5:302021-06-23T04:11:44+5:30
योगा स्टुडिओच्या संचालिका प्रांजली आंबेकर यांनी योगाचे स्वरूप, इतिहास तसेच योगा दिवसाचे महत्त्व सांगितले. या सातही दिवसांत महर्षी पतंजली ...
योगा स्टुडिओच्या संचालिका प्रांजली आंबेकर यांनी योगाचे स्वरूप, इतिहास तसेच योगा दिवसाचे महत्त्व सांगितले. या सातही दिवसांत महर्षी पतंजली यांनी कथन केलेल्या अष्टांग योगानुसार म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अवस्था प्रात्यक्षिकांद्वारे साधकांकडून योग साधना करून घेतली जात आहे.
योगाचार्य प्रसाद आंबेकर यांनी, शारीरिक आरोग्यावर उपचार करून शारीरिक वेदना थांबविता येतात, परंतु शरीराच्या आत असलेले भावनिक आरोग्य, मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्यावर प्राणायामच्या अभ्यासाने ज्यामध्ये शरीरातील ऑक्सिजन पातळीवर नियंत्रण राहते. ओंकार साधनेद्वारे शरीरातील मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रकार चक्र ही सातही चक्रे प्रभावित होऊन संपूर्ण आरोग्याचे सूत्र बदलून शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परिणामी शरीरातील सर्व रक्ताभिसरण संस्था, पचनसंस्था, श्वसनसंस्था, उत्सर्जन संस्था यांचे कार्य सुरळीत होऊन मन शांत, एकाग्र होते. आत्मविश्वास वाढतो. अनुलोम-विलोम तसेच उज्जायन प्राणायामद्वारे शरीरातील भय, चिंता, मनाची उद्विग्नता दूर होऊन १० इंद्रिये तसेच अकरावे मन यावर नियंत्रण राहून परमोच्च सुखाचा अनुभव येऊ लागतो, असे सांगितले.