‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:17+5:302021-05-31T04:14:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी ...

‘Awkali’ did not leave Jalgaon district behind | ‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

‘अवकाळी’ जळगाव जिल्ह्याची पाठ सोडेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटाह जोरदार पाऊस झाला. यामुळे केळीसह इतरही फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने बळिराजावर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे.

पावसाळ्यात अतिपावसामुळे फटका बसल्यानंतर रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा असलेल्या बळिराजाला दर महिन्याला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस होऊन रावेर, यावल, चोपडा, बोदवड, एरंडोल या तालुक्यांतदेखील अवकाळी पावसामुळे केळीसह पपई, पेरू, लिंबू, डाळिंब या पिकांचेदेखील नुकसान झाले. ३५०हून अधिक हेक्‍टर क्षेत्रावर हे नुकसान असून, गुरुवार व शनिवारचे नुकसान पाहता अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले आहे.

या पाच तालुक्यांसह जळगावसह इतर तालुक्यांमध्येदेखील शनिवारी मध्यरात्री विजांच्या कटकडाटात जोरदार पाऊस झाला. या भागातदेखील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष पंचनामे सुरू झाल्यानंतर एकूण नुकसान स्पष्ट होणार आहे. या अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे विजेचे खांबदेखील पडल्याने निम्म्याहून अधिक जळगाव शहर अंधारात होते. यासोबतच हतनूर धरण क्षेत्रात ५८ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाची पातळी १५ सेंटिमीटरने वाढली. मात्र, रविवारी दुपारी उन्हामुळे पाच सेंटिमीटरने कमी झाली.

Web Title: ‘Awkali’ did not leave Jalgaon district behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.