आयुष प्रसाद जळगावचे नवे जिल्हाधिकारी; अमन मित्तल यांची अवघ्या दहा महिन्यात बदली
By विलास.बारी | Updated: July 21, 2023 21:37 IST2023-07-21T21:36:13+5:302023-07-21T21:37:10+5:30
अंकीत यांची जि.प. सीईओपदी नियुक्ती

आयुष प्रसाद जळगावचे नवे जिल्हाधिकारी; अमन मित्तल यांची अवघ्या दहा महिन्यात बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहा महिन्यांपूर्वी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारलेल्या अमन मित्तल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे रुजू होणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अमन मित्तल यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात दहा महिन्यापूर्वी अमन मित्तल यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार अभिजीत राऊत यांच्याकडून स्विकारला होता. दरम्यान अवघ्या दहा महिन्यात जिल्हाधिकारी मित्तल यांची बदली झाल्याने महसूल कर्मचा-यांमध्ये चर्चा सुरु होती. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी अंकित येत आहेत. डॉ.पंकज आशिया यांनी ५ जुलै २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा पदभार स्विकारला होते.