रुस्तमजी स्कूलची विद्यार्थिनी आयुषी पायघनला दहावीत 99.60 टक्के

By Admin | Published: June 4, 2017 11:21 AM2017-06-04T11:21:19+5:302017-06-04T11:21:19+5:30

रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या आयुषी राजेंद्र पायघन (बारी) या विद्यार्थिनीने 500 पैकी सर्वाधिक 498 (99.60 टक्के) गुण मिळविले.

Ayushiji Pasant, a student of Rustamji School, gets 10.65 percent | रुस्तमजी स्कूलची विद्यार्थिनी आयुषी पायघनला दहावीत 99.60 टक्के

रुस्तमजी स्कूलची विद्यार्थिनी आयुषी पायघनला दहावीत 99.60 टक्के

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि. 4 :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी 3 वाजता जाहीर झाला. या परीक्षेत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या आयुषी राजेंद्र पायघन (बारी) या विद्यार्थिनीने 500 पैकी सर्वाधिक 498 (99.60 टक्के) गुण मिळविले. 
बालरोग तज्ज्ञ डॉ.राजेंद्र पायघन व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.दीप्ती पायघन यांची ती कन्या आहे. संस्कृत व विज्ञान दोनच विषयात तिला 99 तर इतर सर्व विषयात 100 गुण मिळाले आहेत. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधील विराज शिवराज मुळीक या विद्याथ्र्याने 99 टक्के गुण प्राप्त केले आहेत. 
बारावीनंतर दहावीच्या  निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली असून निम्म्याहून अधिक शाळांमध्ये मुलीच प्रथम आल्या आहेत. रुस्तमजी इंटरनॅशनलमधून आयुषी पायघन,  गोदावरी स्कूल मधून स्वपAाली पाटील, केंद्रीय विद्यालयातून जागृती पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला.  

Web Title: Ayushiji Pasant, a student of Rustamji School, gets 10.65 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.