ब:हाणपूर जागतिक पर्यटनाच्या शक्तिकेंद्राला इच्छाशक्तीची गरज

By Admin | Published: May 3, 2017 02:37 PM2017-05-03T14:37:25+5:302017-05-03T14:37:25+5:30

वीकेण्ड या सदरात किरण चौधरी यांनी संस्कृती या विषयावर केलेले लिखाण.

B: HANPUR The need for the willpower of the World Tourism Center | ब:हाणपूर जागतिक पर्यटनाच्या शक्तिकेंद्राला इच्छाशक्तीची गरज

ब:हाणपूर जागतिक पर्यटनाच्या शक्तिकेंद्राला इच्छाशक्तीची गरज

googlenewsNext

 महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात  अजूनही मराठमोळ्या मराठी संस्कृती व संस्काराची  खाण असलेल्या मातीचा सुगंध ब:हाणपूरच्या ऐतिहासिक व धार्मिक अशा समृद्ध वारशामुळे  जगाच्या पाठीवर दरवळत आहे. जागतिक वारसा दिनानिमित्त या ऐतिहासिक वारशाला ब:हाणपूर सिंहावलोकनातून मिळालेला सोन्याचा मुलामा  पर्यटकांना आकर्षित करण्याचा मूलमंत्र देऊन गेला. 

शुंगयुग तथा सम्राट अशोक मौर्यकालीन युगापेक्षाही प्राचीन वारसा असलेल्या ब:हाणपूरला जागतिक वारशाचे नामांकन करण्यासाठी देशातील ख्यातनाम विद्यापीठांचे शोधप्रबंध मागवून केंद्र सरकारच्या माध्यमातून जागतिक कीर्तीची ‘हेरिटेज सिटी’ करण्यासाठी सर्वानीच प्रय} करण्याची गरज आहे. 
स्कंद पुराणातील ‘तापी माहात्म्यात’ महर्षी व्यास यांनी तापीकाठच्या ब:हाणपूरचा ब्रघ्नपूर  म्हणून उल्लेख केला आहे.  ठाठरबल्डी येथील सीतागुफेजवळ महूच्या जंगलात वडाच्या झाडाला आलेले पाषाणत्व प्राचीनतेची साक्ष आजही पर्यटकांना भुरळ घालणारी ठरली आहे.
असीरगड किल्ल्यावरून थेट तापीकाठच्या मोहनसंगमावर स्नान करून  गुप्तेश्वर महादेव मंदिरात पूजेसाठी येणा:या अश्वत्थामाची महती असो, वा आग्राभेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेब बादशाहसोबत भेटीचा संदेश देणारे राजा जयसिंगाची छत्री, शाही किल्ला, शाही हमाममधील कलात्मक भित्तीचित्र, बेगम मुमताजची आग्रा येथील ताजमहाल पूर्वीची तापी नदीकाठावरील आहूखान्यातील सहा महिने ठेवलेले समाधीतील पार्थिव, बोहरा समाजातील भाविकांची मक्का असलेले दरगाह-ए-हकिमी, गुरू गोविंदसिंह यांच्या हस्तलिखित धर्मग्रंथ असलेले गुरुद्वारा बडी संगत तथा मुस्लीम समाजाच्या अरबी व पारशी भाषेत लिहिलेल्या भित्तीचित्रातील धर्मसंदेश, स्वामी नारायण मंदिर,  संत कबीर यांचे  मंदिर  अशा सर्वधर्म समभावाने प्रेरित आणि साधुसंतांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक व पौराणिक समृद्ध वारशाला शोध चर्चासत्राप्रसंगी नवसंजीवनी मिळाली आहे. 
सूर्यकन्या तापी नदीच्या दोन्ही तिरावर वृक्षलागवडीची हिरवळ निर्माण करून व राजघाट ते नागङिारीदरम्यान पर्यटनपथ निर्माण होणार असल्याने ब:हाणपूरकरांसाठी हा चैतन्यदायी ठेवा असेल. 
देशभरातील  विद्यापीठांकडून   ऐतिहासिक व पौराणिक समृद्ध वारशाचे संशोधन करून केंद्र सरकारच्या माध्यमातून जागतिकस्तरावरील मानांकनासाठी नामांकन करण्याची ग्वाही महिला व बालकल्याणमंत्री अर्चना चिटणीस यांनी दिली. 
सातत्याने अभिजात मराठी  लोकसंगीत, मराठी लोकनृत्य, व मराठी लोककलांचा जागर करून मराठी रसिकांची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी  अर्चना चिटणीस यांनी केलेली प्रय}ांची पराकाष्ठा कौतुकास्पद आहे. मराठमोळ्या                संस्कृतीला लाभलेली ऐतिहासिक व धार्मिक वारशाची जागतिक कीतीर्ची सोनेरीकडा सुवर्णाक्षरात नोंदली जावी, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
मोगलकालीन सुभेदार अब्दुल रहिम खाना यांनी सातपुडय़ाच्या पर्वतराईतून थेट जामा मशिदीर्पयत निर्माण केलेला ‘कुंडी-भंडारा’ हा भूजलविज्ञानाचा तत्कालीन मूर्तिमंत नजारा आजच्या भूजलवैज्ञानिकांसाठी संशोधनाचा विषय ठरला आहे. 
जगातील या आश्चर्याला जागतिक पातळीवर मानांकित करण्यासाठी त्याचे संवर्धन करण्याचा पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी प्रय} करणे गरजेचे आहे.  
कुंडी-भंडा:याचा जलप्रवाह सद्य:स्थितीत आटल्याने सातपुडय़ाच्या भागात असलेल्या जलस्नेतांच्या उगमक्षेत्रात वृक्षलागवडीसाठी व संवर्धनासाठी शासनाच्या पुरातत्व विभागाला तथा पर्यटनप्रेमींना प्रवृत्त होण्यासाठी भाग पाडणारा आहे. 
- किरण चौधरी 

Web Title: B: HANPUR The need for the willpower of the World Tourism Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.