गरुड महाविद्यालयास नॅकचे बी प्लस मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:50+5:302021-08-27T04:20:50+5:30

शेंदुर्णी, ता. जामनेर : दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित येथील र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान ...

B Plus rating of NAC to Garud College | गरुड महाविद्यालयास नॅकचे बी प्लस मानांकन

गरुड महाविद्यालयास नॅकचे बी प्लस मानांकन

Next

शेंदुर्णी, ता. जामनेर : दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचालित येथील र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने पुनर्मूल्यांकन केले. त्यात बी प्लस मानांकन देण्यात आले आहे.

समिती अध्यक्ष म्हणून शिवामोगा, कर्नाटका येथील कोवेम्पू विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. टी. आर. मंजुनाथ, सदस्य समन्वयक म्हणून काश्मीर विद्यापीठाचे प्रा. डॉ. एम. ए. खुरू, तर सदस्य म्हणून जालंधर पंजाब येथील पीसीएम महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. किरण अरोडा होत्या.

दोन दिवसीय भेटीदरम्यान समितीने महाविद्यालय, अनुषंगिक सेवा सुविधा, व्यवस्थापन मंडळ, माजी विद्यार्थी संघ, पालक, आजी विद्यार्थी, विद्यार्थी, शिक्षक यांचे विविध क्षेत्रातील यश, त्यांची कामगिरी, महाविद्यालय विभागनिहाय कामगिरी, आयक्यूएसीची गुणवत्तापूर्ण कामगिरी इत्यादींचे अवलोकन केले व या सर्व कामगिरीच्या आधारावर महाविद्यालयास बी प्लस दर्जा देऊन मानांकित केले.

यासाठी दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीश काशिद, सहसचिव दीपक गरुड, संचालिका उज्ज्वला काशिद, संचालक सागरमल जैन, यू. यू. पाटील, वसतिगृह सचिव कैलास देशमुख, सर्व संस्था पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: B Plus rating of NAC to Garud College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.