बाप-लेकाने वाचविले माकडाचे प्राण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:15+5:302021-08-29T04:18:15+5:30
चाळीसगाव : कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या आणि झाडावरून पडून जखमी झालेल्या माकडाला शेतकरी बाप-लेकाने जीवदान दिले. ...
चाळीसगाव : कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या आणि झाडावरून पडून जखमी झालेल्या माकडाला शेतकरी बाप-लेकाने जीवदान दिले. या माकडाला वन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. ही घटना पिंपरखेड येथे नुकतीच घडली.
पिंपरखेड गावात कारखाना परिसरात माकडांचा कळप आला अन् त्यातील एक माकड उंच झाडावरून पडले. कमरेला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याला चालता येत नव्हते. दोन दिवसांपासून ते जखमी होऊन पडून होते. कुत्रे त्याला चावा घेत होते. गावातील शेतकरी श्यामराव जाधव व त्यांचा मुलगा संदीप जाधव यांनी या माकडला खायला दिले. रात्री पावसात ते या माकडाजवळच थांबले. गावातील प्राणीमित्र सम्राट सोनवणे यांनी या माकडावर प्रथमोपचार केले. वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी वनविभागाला माकडाची माहिती दिली. वनविभागाची टीम संजय जाधव, बाळू शितोळे, दिनेश कुलकर्णी हे पिंपरखेड गावात दाखल झाले. सोबत गावातील भूषण लिंगायत, नागसेन सोनवणे, कृष्णा भोसले आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले. पुढे चाळीसगाव येथे उपचार करण्यासाठी नेण्यात आले.