महिला प्रवाशांशी मैत्रीचे नाते जपणाऱ्या बेबाबाई महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:52 AM2019-03-08T00:52:21+5:302019-03-08T00:52:36+5:30
वाहक म्हणून जबाबदारी
श्याम सराफ
पाचोरा - वेगवेगळ्या क्षेत्रात महिला कार्यरत असतात. त्यात एसटी आगारात वाहक म्हणून जबाबदारी संभाळणे हे देखील महत्वाचे कार्य. महिला म्हणजे चूल व मुलं अशी संकल्पना आता लोप पावली असून ग्रामीण भागातील महिला देखील आता मागे राहिल्या नाही. अशीच एक महिला वाहक बेबाबाई नरेंद्र महाले ह्या विवाहित महिला नेरी ता पाचोरा या खेडे गावातील रहिवासी. महिलांना बसमध्ये जागा करून देण्यासाठी त्या परिचित झाल्याने त्या महिला प्रवाशांच्या मैत्रीणच बनल्या आहेत.
शेतकरी कुटुंबातील या महिलेने कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी वाहक पदाची परीक्षा दिली. २००५ मध्ये पाचोरा आगारात वाहक म्हणून नियुक्ती झाली. पाचोरा आगारात पाचोरा ते मालेगाव, चाळीसगाव, जळगाव या बसमध्ये त्या वाहक म्हणून आपले कार्य करतात. त्या बसमध्ये प्रवाशांची विचारपूस करून महिला प्रवाशांना जागा उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे नेहमी प्रवास करणारे प्रवाशी महिला खुश राहतात. बेबाबाई महाले ह्या आपल्या कुटुंबाचा राहडगाडा सांभाळून आपले कार्य प्रामाणिक पणे सांभाळतात.