दोन पॉझिटीव्ह मातांचे बाळ निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:21 PM2020-07-17T12:21:19+5:302020-07-17T12:21:30+5:30

जळगाव : गेल्या आठवड्यात कोरोना बाधित दोन मातांनी दोन बाळांना जन्म दिला होता़ या दोघाही बाळांचे कोरोना तपासणी अहवाल ...

The baby of two positive mothers is negative | दोन पॉझिटीव्ह मातांचे बाळ निगेटीव्ह

दोन पॉझिटीव्ह मातांचे बाळ निगेटीव्ह

Next

जळगाव : गेल्या आठवड्यात कोरोना बाधित दोन मातांनी दोन बाळांना जन्म दिला होता़ या दोघाही बाळांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आठवडाभरानंतर मातांनीही कोरोनावर मात केली. आता बाळ आणि त्यांच्या मातांना घरी सोडण्यात आले आहे़ कोविड रुग्णालयात त्यांची यशस्वी प्रसुती करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील एका ३५ वर्षीय गर्भवती महिलेला ४ जुलै रोजी बाधित म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या महिलेला ७ जुलै रोजी स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ संजय बनसोडे, भूलतज्ज्ञ डॉ़ गणेश भारूळे, डॉ़ प्रदीप पुंड, प्रिया पाटील, डॉ़ अतुल गजरे आणि टीमने हे सिझेरीयन केले़ या बाळाच्या मानेला नाळेचे वेढे पडले होते़ मात्र, अशा स्थितीत ही अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी करून दोघांना जीवदान दिले़ या महिलेने सुखरूप मुलीला जन्म दिला़ या बाळाचेही नमुने घेण्यात आले होत़े

८ जुलै रोजी जळगाव शहरातील एका बाधित महिलेची सामान्य प्रसुती झाली होती़ यावेळी बाळाचेही नमुने घेण्यात आले होते़ ९ जुलै रोजी या बाळाचा अहवाल निगेटीव्ह आला होता़ मात्र, एका बाळाचा अहवाल अस्पष्ट असल्याने पुन्हा घेण्यात आला़ तोही निगेटीव्ह आला़ शिवाय यातील सिझर झालेल्या मातेनेही कोरोनावर मात केल्याने बाळाला कपडे व मातेला साडी चोळी देऊन निरोप देण्यात आला़

बाधित मातांची सुखरूप प्रसुती होऊन त्यांच्या बाळांचीही तब्येत चांगली आहे. बाळांचे अहवाल निगेटीव्ह असून या दोन्हीी मातांनी कोरोनावर मात केली आहे़ त्यामुळे अशा स्थितीत मातांनी घाबरून जावू नये, अशा मातांची कोविड रुग्णालयात पूर्ण काळजी घेतली जाते़
- डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता शासकीय महाविद्याल व रुग्णालय, जळगाव.

Web Title: The baby of two positive mothers is negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.