बाळाची डॉक्टर व नर्सकडून पुरेपुर काळजी, मात्र चिंता सतावतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:07+5:302021-01-14T04:14:07+5:30
नवजात शिशू कक्षात कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली व इतर कारणांमुळे अशक्त असलेली बालके ठेवली जातात. या बाळांच्या आरोग्याची पुरेपूर ...
नवजात शिशू कक्षात कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली व इतर कारणांमुळे अशक्त असलेली बालके ठेवली जातात. या बाळांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी येथील डॉक्टर व परिचारिकांवर असते, तर या बाळांच्या मातांना स्वतंत्र कक्षात उपचारासाठी पाठविले जाते, तसेच ज्या बाळांची तब्येत बरी नसेल अशा बाळांसोबतच संबंधित मातानांही राहण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार जळगाव जिल्हा रुग्णालयातही वरीलप्रमाणे बाळांची व मातांची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. संबंधित मातांना जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा शिशू कक्षात बाळाला भेटण्यासाठी परवानगी दिली जाते. स्तनपान करू दिले जाते. अगदी कुटुंबियांप्रमाणे येथील डाॅक्टर्स व परिचारिका काळजी घेत असल्याचे येथील मातांनी सांगितले.
इन्फो :
माझ्या बाळाचे वजन अत्यंत कमी होते. बाळ स्तनपानही व्यवस्थित घेत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आठवडाभरापासून याठिकाणी उपचार घेत आहे.
-अनिता बारेला
इन्फो :
येथील नवजात शिशू कक्षात डॉक्टर व नर्स सतत बाळाच्या तब्येतीकडे लक्ष ठेवत असतात, चौकशी करत असतात, चांगले उपचार मिळत आहेत. मात्र, या परिवारापासून दूर याठिकाणी राहण्याची भीती वाटते.
-मनीषा चव्हाण
इन्फो :
शिशू कक्षात बाळाला स्तनपान करण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी केव्हाही जाऊ देतात, कधीही भेटू दिले नाही, असे झाले नाही. अगदी घराप्रमाणे काळजी घेतली जात असून, येथील वातावरणही प्रसन्न आहे.
-मनीषा पाटील