शेंदुर्णीत व्यवहार पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:47 PM2019-02-09T23:47:44+5:302019-02-09T23:50:29+5:30
छेडछाड प्रकरणातील आरोपी जामिनावर
शेंदुर्णी, ता.जामनेर : महिलेची छेड काढल्यावरून तणाव निर्माण झालेल्या शेंदुर्णी येथे शनिवारी तिसऱ्या दिवशी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. या प्रकरणातील आरोपींना जामिना सोडण्यात आले.
७ रोजी महिलेची छेड काढल्यावरून येथे दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण होऊन ८ रोजीदेखील बाजारपेठ बंद होती. इतकेच नव्हे ग्रामस्थांनी पोलिसांविरोध रोष व्यक्त करीत तसे फलकही गावात लावले व ठिय्या आंदोलन केले होते.
९ रोजी शेंदुर्णी बाजारपेठ, अत्यावश्यक सेवा, शाळा, महाविद्यालय, दैनंदिन व्यवहार सुरुझाले.
या प्रकरणातील आरोपींना जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
पोलीस ठाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
शेंदुर्णी हे जामनेर तालुक्यातील सर्वात मोठी व्यापार पेठ असलेले गाव आहे. येथील व परिसरातील १४ गावातील लोकसंख्या पाहता शेंदुर्णीला पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे. वारंवार शांततेच्या बैठकीत केलेला तात्पुरता ठरावा कागदावरच राहतो. प्रत्यक्षात अंमलात येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ व व्यापारी या बाबत संताप व्यक्त करतात. पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत शेंदुर्णी दूरक्षेत्र असून या क्षेत्राला सहाय्यक पोलीस निरीक्षक पद रिक्तच आहे. पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत या दूर क्षेत्राला दप्तरी कागदोपत्री दहा पोलिसांचा बंदोबस्त असला तरी काही न्यायालयीन कामासाठी व काही साप्ताहिक सुट्टी यामुळे प्रत्यक्षात चारच जण कार्यरत असतात. शांततेच्या बैठकीच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्ष, पत्रकार यांनी वारंवार सूचना देऊनदेखील गावाच्या शांततेकडे शासन, पोलीस अधिकारी दुर्लक्ष करतात असा आरोप ग्रामस्थांचा आहे. वारंवार अशा घटना घडल्यावर तात्काळ व्यापारपेठ बंद केली जाते. एवढेच नव्हे तर ज्या व्यापाºयाचा कोणत्याही वादाशी संबंध नसतानादेखील दरवेळेस दुकानांवर दगडफेक केली जाते. यातून मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी व शासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून पुरेसे पोलीस कर्मचारी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ, व्यापाºयांची आहे.