प्रतिकूल परिस्थितीतही सुरू आहे ‘ज्ञानयज्ञ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 11:46 AM2017-07-28T11:46:29+5:302017-07-28T11:48:44+5:30
मराठे आदिवासी शाळा : शिक्षकांना पगार नाही, अनुदान नाही, 14 जण देताहेत सेवा
ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे
जळगाव, दि. 28 - दान दिल्याने ज्ञान वाढते.. त्या ज्ञानाचे मंदिर हे..
गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या या ओळी.. सातपुडय़ाच्या आदिवासी भागात एक शाळा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करीत सुरू आहे. प्रतिकुलता कशी असू शकते, इथे गेल्यावरच त्याचा अर्थ कळू शकेल.. इतके प्रतिकूल. तरीही ज्ञानयज्ञाचे काम अविरत सुरू आहे तेही बाहेरून मिळणा:या मदतीवर.
ही शाळा आहे, आदिवासी जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, लासूर संचलित वीर खॉजा नाईक निवासी आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मराठे, ता.चोपडा (जि. जळगाव) इथली. 14 शिक्षक विनापगार या मुलांना शिकवतात. शाळेला अनुदान हा विषयच नाही. 300 ते 400 विद्यार्थी इथे निवासी शिक्षण घेत आहेत. पहिली ते नववीपयर्ंत वर्ग इथे भरतात.
मुलांना शाळेत आणण्यासाठी ही शिक्षक मंडळी मुलांच्या घरी जातात आणि त्यांची समजूत घालून शाळेत आणतात. मुले आणि पालकही आनंदी. कारण इथे दोन वेळच्या जेवणाची सोय होत असते. अर्थात हे सगळे सुरू आहे बाहेरुन मिळणा:या मदतीवर.
निवासी शाळा असली तरी चारही बाजूने पत्र्याचा आडोसा करून तात्पुरती केलेली बसण्याची व्यवस्था. संस्थेचे अध्यक्ष गोपाल भिका चौधरी यांनी आपली जमीन विकून मिळालेल्या पैशातून शाळा काढली. त्याच पैशातून आणि बाहेरुन येणा:या मदतीवर शाळेचा दिनक्रम आणि विद्याथ्र्याच्या भोजनाची व्यवस्था केली जाते.
विद्यादानाचा अवितरत यज्ञ
चोपडा आणि परिसरात राहणारे 14 तरूण विद्यादानाचा हा यज्ञ अविरत चालावा म्हणून झटत आहेत. हे शिक्षक कधी कधी तर चोपडा परिसरात फिरून गहू, तांदूळ व धान्य जमा करून या मुलांच्या दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करतात. वह्या आणि पुस्तकेही अशीच मागून जमा केली जातात. ब:याचदा तर एका पुस्तकावरच भागविले जाते.
कपडे, चपला, दप्तर वगैरे सर्व मिळाले तर ठिक नाही तर असेच अनवाणीच. अशा या प्रतिकूल परिस्थितीत हा ज्ञानयज्ञ सुरू आहे.
जळगावातील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील हे आदिवासी भागात जाऊन मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य देत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात असताना त्यांना मराठे येथील शाळेची माहिती मिळाली. तिथली स्थिती पाहून त्यांनीही मग मदतीचा हात पुढे केला.
सोशल मीडियाची मदत
या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरुन या शाळेची माहिती दिली आणि विद्याथ्र्यासाठी मदतीचे आवाहन केले. त्यांना मग डॉ. राहुल पाटील, डॉ. सुशील मंत्री, दीपक परदेशी यांची साथ मिळाली. एकएक म्हणता जळगाव आणि परिसरातून पाल्याचे जुने कपडे, वह्या-पुस्तके, कंपास, पेन, पेन्सिल, दप्तर, वॉटरबॅग, चप्पल, बूट, स्वेटर, रेनकोट, छत्री असे साहित्य जमा होऊ लागले. बन्साली या तरुण मित्राने 300 गणवेशांची व्यवस्था केली. अनेकांनी धान्य देऊ केले. असे 10 क्विंटल धान्य जमा झाले. हे सर्व साहित्य मग मराठे येथील शाळेत पोहोचविण्यात आले. यापेक्षाही अधिक मदत मिळवून देण्याचा निर्धार या डॉक्टर्सनी केला आहे. ज्यांना या ज्ञानयज्ञात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी दुकान नं. 6 ए विंग, तळमजला चौधरी यात्रा कंपनीशेजारी स्टेडियम कॉम्प्लेक्स, जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत सेवाभावी शिक्षक व कर्मचारी
माध्यमिक मुख्याध्यापक- समाधान ढिवरे, विकास राजकुळे, प्राथमिक मुख्याध्यापक- सागर तायडे, विशाल इंगळे, मिलिंद बोरसे, पंकज महाजन, मनीषा पाटील, हर्षल पाटील तसेच कर्मचा:यांमध्ये चंद्रशेखर पाटील, विशाल चौधरी, विवेक जोशी, विजय जोशी, ज्ञानेश्वर धनगर, सरला धनगर, आशा सपकाळे, संगीता पारधी यांचा समावेश आहे.
आदिवासी भागात मदत देण्याचे काम गेल्या चार वर्षापासून करीत आहे. आतार्पयत अनेक ठिकाणी अशी मदत मिळवून दिली आहे. ती यापुढेही सुरुच राहणार आहे. येत्या 15 दिवसात आदिवासी भागातील 1500 गर्भवती महिलांना हिमोग्लोबीनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
- डॉ. रितेश पाटील, जळगाव
आपण घरात असतो त्यावेळी आपले विश्व कुटुंबापुरते मर्यादित असते. पण इथल्या शाळेत आल्यावर आपण आपलाच नाही; तर जगाचा विचार करू लागतो.. म्हणून आम्हालाही या शाळेचा लळा लागला आहे.
- सागर तायडे, मुख्याध्यापक, प्राथमिक, मराठे, ता. चोपडा