निकृष्ट खाद्यपदार्थ देणा:या सेल किचन चालकाला 50 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:41 PM2017-08-05T17:41:58+5:302017-08-05T17:53:39+5:30
भुसावळ डीआरएमकडून ब:हाणपूर रेल्वेस्थानकाची तपासणी. कॅग अहवालानंतर रेल्वे अधिका:यांनी खानपान व्यवस्थेकडे वेधले लक्ष
Next
प ढरीनाथ गवळी/ ऑनलाईन लोकमतभुसावळ,दि.5 - भारतीय रेल्वेतील खानपान व्यवस्था आणि प्रवाशांना दिले जाणारे जेवण, विविध खाद्यपदार्थ यांच्या दर्जाबाबत कॅगने दिलेल्या अहवालाची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार भुसावळ डीआरएम यांनी शनिवारी ब:हाणपूर रेल्वेस्थानकाची तपासणी केली. भुसावळ रेल्वे स्टेशनवरील सेल किचन चालकाला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.विभागीय स्तरावर खानपान व्यवस्थेवर लक्ष ठेऊन त्याची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्या अनुषंगाने भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांनी खानपान व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी विभागातील सर्व महत्त्वाच्या स्थानकावरील खानपान सेवेची तपासणी सुरू केली आहे. दोनच दिवसापूर्वी त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरील सर्व चोरवाटा सील करण्याचे आदेश दिले आहेत.विना परवाना व्हेंडर्स बाहेर खाद्य पदार्थ तयार करुन ते या चोरवाटांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर प्रवाशांर्पयत पोहचून विक्री करतात त्यामुळे डीआरएम यादव यांनी या चोरवाटाच सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानकावर बाहेरचे पदार्थ विकले जाऊ नये यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सेल किचन चालकाला 50 हजार रुपयांचा दंड भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवरील सेल किचनमध्ये अस्वच्छता आणि खाद्यपदार्थ निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने डीआरएम यादव यांनी पाहणीच्या वेळी सेल किचन चालकास 50 हेजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली. प्रवाशांना शुद्ध व ताजे पदार्थ देण्याच्या सूचना केल्या.ब:हाणपूर येथील चोरवाट सीलदरम्यान, शनिवारी आर.के.यादव आणि त्यांच्या सहका:यांनी भुसावळ विभागातील ब:हाणपूर येथील रेल्वे स्थानकाची आणि तेथील खानपान व्यवस्थेसह स्थानकाच्या सुरक्षेची पाहणी केली. ब:हाणपूर स्थानकावरील सर्व चोरवाटा सील करण्याचे आदेश यादव यांनी दिल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.