कारमधून पडलेली बॅग दुचाकीस्वारांनी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:30+5:302020-12-12T04:33:30+5:30
जळगाव : कारच्या डिक्कीतून पडलेली बॅग दुचाकीस्वारांनी उचलून लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. या ...
जळगाव : कारच्या डिक्कीतून पडलेली बॅग दुचाकीस्वारांनी उचलून लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. या बॅगेत चार तोळे सोने व कपडे होते. धर्मेंद्र महेश पाटील (३६, रा.हिरापूर, जि.खंडवा, मध्य प्रदेश) यांच्या मालकीची ही बॅग होती. पाटील हे लग्नासाठी गुरुवारी एमआयडीसीत आले होते. सोबतची बॅग त्यांनी रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी कॉलनीत जगदीश कन्हैयालाल पाटील यांच्याकडे ठेवली होती. शुक्रवारी लग्न लागल्यानंतर परत जाण्यासाठी ते पाटील यांच्याकडे गेले. बॅग कारच्या डिक्कीत ठेवली, मात्र चुकून डिक्की लागली नाही. एमआयडीसीत पोहोचल्यावर बॅग काढायला गेले असता डिक्की उघडी होती, तर बॅग गायब होती. त्यामुळे सर्व नातेवाइकांनी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या मदतीने रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता स्वामी समर्थ मंदिराजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ही बॅग उचलली व ती घेऊन जात असल्याचे कॅमेऱ्यात दिसून येत आहे.