्रवाणेगावच्या बेपत्ता खेळाडूची केरळमध्ये आढळली बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 12:34 AM2017-01-21T00:34:11+5:302017-01-21T00:34:11+5:30
जळगाव: नातेवाईकांकडून अपहरणाचा संशय
जळगाव : पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील रामकृष्ण भास्कर पाटील (वय २२) हा हॉकी खेळाडू बेपत्ता झाल्याची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे़ ३ जानेवारी रोजी पंजाब राज्यातील सोनपत येथे रेल्वेने जाणाºया या तरूणाची तब्बल दहा दिवसानंतर केरळ राज्यातील रेल्वे स्थानकावर बॅग आढळून आल्याने नातेवाईकांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे़़
गेल्या तीन वर्षांपासून शिक्षणसाठी रामकृष्ण जळगावात वास्तव्यास असून नूतन मराठा महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान या वर्गात शिक्षण घेत आहे़ हॉकी मध्ये राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये त्याने यश मिळविले आहे़ यामुळे रामकृष्ण हा देशभरात विविध ठिकाणी होणारे प्रशिक्षण शिबिराला हजेरी लावतो़ तो ३ जानेवारी रोजी सचखंड एक्सप्रेसने सोनपत येथे प्रशिक्षणासाठी जळगाव स्थानकावरून बसला. तीन ते चार दिवसानंतर त्याच्या संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला़ जळगाव गाठले असता तो सोनपत येथे गेल्याची माहिती मिळाली़
पल्लाखाड स्थानकावर बॅग मिळाली
रामकृष्ण हा नेहमी प्रशिक्षण शिबिरासाठी बाहेर जातो, त्याप्रमाणे गेला असेल मात्र मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने नातेवाईकांकडून शोध सुरू होता़ यादरम्यान अचानक रामकृष्ण याच्या घरच्या मोबाईवर केरळ राज्यातील पल्लाखाड स्थानकावरील रेल्वे पोलिसांचा फोन आला़
एक बॅग मिळाली असून त्यात एका चिठ्ठीवर मोबाईल क्रमांक असल्याने फोन केल्याचे त्यांनी सांगितले़ नातेवाईकांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन करून बॅग मिळाल्याची खात्री केली़
अठरा वषार्नंतर झाला मुलगा
भास्कर सिताराम पाटील हे शेती करतात़ लग्नाच्या अठरा वषार्नंतर त्यांना मुलगा झाला आहे.