इटारसी पॅसेंजरमधून बॅग लांबविली
By admin | Published: July 7, 2017 04:35 PM2017-07-07T16:35:20+5:302017-07-07T16:35:20+5:30
भुसावळ लोहमार्ग पोलिसात नोंद. 70 हजाराचा ऐवज लुटला
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.7 - इटारसी -भुसावळ पॅसेंजरने प्रवास करणारे शिरीष वसंत भिडे यांची बॅग चोरटय़ांनी लांबली. ही घटना 7 जुलै रोजी दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास खंडवा (म.प्र.) रेल्वे स्थानकावर घडली.
नवी दिल्ली येथील शिरीष भिडे (वय 58,जी-दोन/65 मदनगीर, खानपूर, सैनिक फार्म नवी दिल्ली) हे इटारसी-भुसावळ पॅसेंजर गाडीने व्हीआयपी सुटकेस बर्थखाली ठेऊन प्रवास करीत होते. त्यांना झोप लागल्याने चोरटय़ांनी व्हीआयपी सुटकेस चोरुन पलायन केले. गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर थांबली, त्यावेळी त्यांना जाग आली. बॅग शोधली असता ती सापडली नाही. बॅगेतील 4 हजार 500 रुपये रोख, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम, अपंग प्रमाणपत्र, पुखराज, नीलम, पन्ना, मोती असे र} व कपडे असा एकूण 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला.ही घटना खंडवा येथे घडल्याने येथील लोहमार्ग पोलिसांनी हा गुन्हा खंडवा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.