जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाची कारमधून बॅग लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:02 PM2018-01-11T12:02:24+5:302018-01-11T12:06:01+5:30

लॅपटॉप केला लंपास

The Bag theaf from car in Jalgaon | जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाची कारमधून बॅग लांबविली

जळगावात बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकाची कारमधून बॅग लांबविली

Next
ठळक मुद्देचोरटा कॅमेरात कैद पेनड्राईव्ह, महत्वाची कागदपत्रे तसेच मेमरीकार्ड लंपास

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-: पैसे पडल्याचे सांगून चालकाचे लक्ष विचलित करत बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांचा 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असलेली बॅग कारमधून लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवी पेठेत घडली. संशयित सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बीएचआर मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटी येथे अवसायक असलेले जितेंद्र गुलाबराव कंडारे (रा.शिवाजी नगर, जळगाव) हे मंगळवारी सकाळी 10.30 वाजता चालक गिरीश संतोष कोळी याच्यासह कारने (क्र.एम.एच.19.बी.यु.2323) नवी पेठेतील लवाद प्राधिकरण कार्यालयासाठी कामानिमित्त आले होते. यावेळी कार्यालयीन कामकाजाची बॅग त्यांनी चालकाच्या बाजुच्या सीटवर ठेवली होती. त्यात लॅपटॉप पेनड्राईव्ह, महत्वाची कागदपत्रे तसेच मेमरीकार्ड असे होते. कंडारे हे लवाद कार्यालयात गेले तेव्हा चालक गिरीश हा कारमध्ये एकटाच होता. रस्त्याच्या कडेला कार उभी केल्यानंतर एक तरूण त्याठिकाणी आला व तुमचे पैसे पडले असे त्याने चालकाला सांगितले. गिरीश यांनी कारखाली उतरून पाहिले असता त्याचवेळी पुन्हा एक तरुणी आली व तीही चालकाला पैसे पडल्याचे सांगून निघून गेली. रस्त्यावर पडलेले चाळीस रुपये उचलून गिरीश कारमध्ये बसला असता सीटवर ठेवलेली बॅग गायब झालेली होती.
चोरटा कॅमेरात कैद
दरम्यान, घटनेनंतर शहर पोलिसांच्या डिबी पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. यानंतर परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटा कैद झाला असून कारमधून बॅग चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्या तरूणाचा पोलीस शोध घेत आहेत. 

Web Title: The Bag theaf from car in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.