एम.आय.एम.च्या जिल्हाध्यक्ष पदावरून बागवान यांना हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:01+5:302021-03-31T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत एम.आय.एम.च्या तिन्ही नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौर व उपमहापौर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत एम.आय.एम.च्या तिन्ही नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांना मतदान केल्यामुळे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान व मनपातील गटनेते रियाज बागवान यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी याबाबत सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत राज्य पातळीवरून शिवसेनेला मतदान करण्याबाबत नगरसेवकांना सूचना नसतानादेखील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांना मतदान केले होते. याबाबत आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्व नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटीसदेखील बजावली होती. याबाबत एमआयएमच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षाकडे आपला खुलासा सादर केला आहे. मंगळवारी एमआयएमचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पुढील कामकाजाबाबत माहिती दिली. या वेळेसच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जीया बागवान व मनपातील गटनेते रियाज बागवान यांचीदेखील उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.