महाराष्ट्रात पहिलाच वानप्रस्थाश्रम साकारतोय बहादरपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 07:37 PM2020-01-18T19:37:44+5:302020-01-18T19:38:41+5:30

महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

Bahadurpur is experiencing the first time in Maharashtra | महाराष्ट्रात पहिलाच वानप्रस्थाश्रम साकारतोय बहादरपूरला

महाराष्ट्रात पहिलाच वानप्रस्थाश्रम साकारतोय बहादरपूरला

googlenewsNext
ठळक मुद्देरेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांची माहितीमहाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम असल्याचा नीलिमा मिश्रा यांचा दावा

रावसाहेब भोसले
पारोळा, जि.जळगाव : महाराष्टÑात पहिलाच वानप्रस्थाश्रम बहादरपूर, ता.पारोळा येथे साकारणार असल्याचा दावा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केला. लोकवर्गणीतून हा हा आश्रम उभा राहावा यासाठी त्यांनी नववर्षापासून गावोगावी फिरून मदतीसाठी फिरणे सुरू केले आहे.
प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारण्याची कल्पना कशी सुचली?
नीलिमा दीदी- लहानपणी पाहिले होते की एका वृद्धाने आपल्या सुनेकडे जेवण मागितले होते. तिने त्या वृद्ध सासऱ्याच्या तोंडावर दोन रुपयांचे नाणे फेकून मारले होते. तेव्हा या वृद्धांसाठी काही तरी करावे या उद्देशाने प्रयत्न करीत होते.
गेल्या २१ वर्षांपासून समाजात वावरताना असे जाणवले की, समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांच्या तरुण वा वृद्धपणातील अपेक्षा राहून गेल्या आहेत. काही तरी वेगळे करण्याची उर्मी राहून गेली. ते करण्यासाठी या लोकांना वानप्रस्थाश्रम उभे करून त्याचा सामाजिक वा वैयक्तिक इच्छा पूर्ती व्हावी यासाठी ही कल्पना ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुचली.
प्रश्न- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी शासनाचे अनुदान का नाही?
नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रमासाठी शासनाचा निधी घेतला तर शासनाच्या अटी, शर्ती आणि शासनाच्या बंधनात हा वानप्रस्थाश्रम चालवावा लागेल. वानप्रस्थाश्रमाची माझ्या मनातील संकल्पना खूप वेगळी आहे.
प्रश्न- वानप्रस्थाश्रमाची नेमकी वेगळी काय संकल्पना आहे?
नीलिमा दीदी- या वानप्रस्थाश्रम बहादरपूर येथे ग्रामपंचायतीच्या तीन एकर जागेत उभा करावयाचा आहे. या वानप्रस्थाश्रमात वर्षभरातून ५० ते ७५ वर्ष वयोगटातील व्यक्तीला तीन वेळा १५ दिवसांसाठी या ठिकाणी राहायला मिळेल. त्या दरम्यान त्यांच्या मनातील राहिलेला गोष्टी म्हणजे संगीत, गायन पोहणे, शिकणे, वाचन करणे, विविध खेळ खेळणे, सामाजिक कार्य करणे या सर्व गोष्टींसाठी त्यांना या वानप्रस्थाश्रमात सोयी उपलब्ध करून त्याचे स्वप्न पूर्ण केले जातील. कोणतीही बंधने त्यांच्यावर नसतील.
प्रश्न- वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम यात नेमका काय फरक?
नीलिमा दीदी- वृद्धाश्रम ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी हा वानप्रस्थाश्रम आहे. या वानप्रस्थाश्रमात येणाºया प्रत्येक वृद्ध व्यक्तीची कुटुंबापासून ताटातूट होणार नाही. काही दिवस वानप्रस्थाश्रमात राहून पुन्हा तो कुटुंबात रममाण होईल. हाच फरक वृद्धाश्रम आणि वानप्रस्थाश्रम राहील.
प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी पायी यात्रेतून काय हेतू साधणार?
नीलिमा दीदी- गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना. आपण लोकांना बचत गटाच्या माध्यमातून जोडले गेलो आहेत. याचा फायदा वानप्रस्थाश्रम उभारणीच्या कामासाठी करून घ्यावा म्हणून पहिल्या ४० दिवसांच्या खान्देश पायी यात्रेतून या वानप्रस्थाश्रमासाठी कार्यकर्ते उभारणी होईल. लोकांशी मुक्तपणे संवाद साधला जाईल. लोकांच्या भावना कळतील. वानप्रस्थाश्रमासाठी निधी लोकवर्गणीतून उभा करता यावा हाच हेतू आहे.
प्रश्न- वानप्रस्थाश्रमासाठी निधी कसा उभा करणार?
नीलिमा दिदी- वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी एखादा मोठा उद्योजक यांनी निधी ही दिला असता. पण लोकवर्गणीतून हा पैसा उभा राहिला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा पैसा गोळा केला जाणार आहे. त्यासाठी आमच्या बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली उत्पादन त्यात मसाला, हळद लोणचे, धना पावडर या सर्व साहित्याचे एक ५०० रुपये किमतीचे किट तयार करण्यात आले आहे. ते ग्रामीण भागात पदयात्रा वेळी लोकांना सांगितले जाते. महिला ते किट खरेदी करतात व यातून जो नफा आहे तो वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वापरला जाणार आहे.
प्रश्न- या पदयात्रेसाठी लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे?
नीलिमा दीदी- गेल्या ११ दिवसांपासून पदयात्रेच्या माध्यमातून अनेक गावांना भेटी दिल्या. लोकांचा प्रचंड सकारात्मक प्रतिसाद आहे. लोक स्वत:हून या वानप्रस्थाश्रम उभारणीसाठी वैयक्तिक आर्थिक मदत करीत आहे. एवढ्या एक दीड वर्षात हा अद्ययावत असा वानप्रस्थाश्रम उभारला जाईल, याबाबत आशावादी आहे.
निराधार लोकांसाठी अम्मा छत्रालय उभारणार असल्याची भावना नीलिमा मिश्रा यांनी बोलून दाखविली.

Web Title: Bahadurpur is experiencing the first time in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.