अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:31+5:302021-03-07T04:15:31+5:30
जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील अल्पवयीन पीडित मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी ऋषीकेश कोळी (रा.नवी दाभाडी, ता. जामनेर) याचा ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील अल्पवयीन पीडित मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी ऋषीकेश कोळी (रा.नवी दाभाडी, ता. जामनेर) याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी फेटाळून लावला आहे.
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी ८ फेब्रुवारी रोजी तिच्या मामाच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अल्पवयीन मुलीचा गर्भपात झाल्याचेही समोर येताच संशयितांविरुध्द भादंवि कलम ३०५, ३१२, ३१३, ३७६ तसेच लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यापासून सुरक्षणाचा कायदा कलम ४,८,११ व १२ आणि अनु.जा.ज.अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तत्काळ ऋषीकेश कोळी याला अटक करण्यात आली होती. त्याने जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर कामकाज होऊन सुनावणीअंती तो फेटाळून लावण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.