जळगावातील फौजदार पिता-पुत्राचा जामीन फेटाळला

By admin | Published: July 1, 2017 04:30 PM2017-07-01T16:30:17+5:302017-07-01T16:30:17+5:30

जिल्हापेठ पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल

The bail granted to the father-son of Jalgaon rejected | जळगावातील फौजदार पिता-पुत्राचा जामीन फेटाळला

जळगावातील फौजदार पिता-पुत्राचा जामीन फेटाळला

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.1 - बलात्कार प्रकरणातील संशयीत आरोपी असलेला पोलीस शिपाई परवेज शेख व त्याचा फौजदार पिता रईस अब्दुल शेख या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. 
जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस शिपाई परवेज शेख   याच्या विरोधात बलात्काराचा तर त्याचा फौजदार पिता रईस शेख यांच्याविरोधात अश्लिल वर्तन केल्याचा गुन्हा दाखल होता. या दोघांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शनिवारी निर्णय देण्यात आला. दरम्यान, खंडपीठात जाण्यासाठी पूर्वी दिलेल्या तात्पुरत्या अटकपूर्व जामीनास दोन आठवडय़ाची मुदतवाढ द्यावी असा अर्ज बचाव पक्षाच्या वकीलाने न्यायालयात सादर केला. दरम्यान, शनिवारी दोन्ही पिता-पुत्र न्यायालयात आलेच नव्हते, मात्र पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता. जामीन अर्ज फेटाळला असला तरी संशयितांना अद्याप अटक झालेली नाही.
 

Web Title: The bail granted to the father-son of Jalgaon rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.