बजरंग बोगद्याचा पैसा गेला वाया....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:35 PM2019-06-25T12:35:04+5:302019-06-25T12:35:40+5:30
मेहनतीचा पैसा अक्षरश: पाण्यात
शहरातील नवीन तयार करण्यात आलेला बजरंग बोगदा यासाठी प्रशासनाने जळगावकरांच्या मेहनतीचा पैसा अक्षरश: पाण्यात गेला. कारण पावसाला सुरूवात होऊन काही तास झाले आहेत, त्यातच ऐन पावसाच्या तोंडावर सुचलेल शहाणपण ते म्हणजे एसएमआयटी कॉलेज ते बजरंग बोगद्यापर्यंतचे अतिक्रमण काढून नाला दुरुस्तीचे काम. त्यामुळे आधीच रस्त्याची रुंदी कमी. त्यात हा नवीन उपद्व्याप करण्यात आला आहे. त्यात आणखी भर म्हणजे शिवाजी नगर रेल्वे पुलाच्या कामामुळे अतिरिक्त वाढलेली वाहतूक नवीन बजरंग बोगद्यासाठी करोडो रुपये खर्च केले परंतु सर्वकाही पाण्यात गेले. इतके नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध असून अत्यंत गावठी पद्धतीने तयार केलेला बोगदा निकामी ठरलाय. अवघ्या १५ मिनिटाच्या पावसाने बोगद्याखाली कमरे इतके पाणी साचते जर अतिपाऊस झाला तर संपूर्ण बोगदाचं पाण्याखाली झाकला जाईल. यासाठी कोणाकडे दाद मागायची आणि कोणाकडे कैफियत मांडायची. एकवेळ झोपलेल्या माणसाला जागे करता येते, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही, खरंच जळगावकर खूप सोशिक आहेत, ज्यादिवशी जळगावकरांचा सहनशीलतेचा अंत होईल त्यादिवशी मात्र काही खरे नाही, हेही तेवढेच खरे आहे, बघूया काय दखल घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. नाहीतर जनताच दखल घेईल या गोष्टीची!
- जीवन पाटील, जळगाव.