आजपासून बालगंधर्व संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:25+5:302021-01-01T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार १ जानेवारीपासून छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिरात सुरूवात होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार १ जानेवारीपासून छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिरात सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ ते १० यावेळेत सुप्रसिद्ध गायिका शरयु दाते यांचे शास्त्रीय गायन तर अश्विन श्रीनिवासन यांचे बासरी वादन होईल.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जळगाव शहरात बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा १ ते ३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे. पहिल्या दिवशी शरयु दाते, अश्विन श्रीनिवासन हे सादरीकरण करतील. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ ते रात्री १० या दरम्यान कोलकाता येथील ओंकार दादरकर हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन करतील. प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस बॉलिवुड फुटप्रिंट्स यावर कथक सादरीकरण करतील. तर ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ ते रात्री १० यावेळेत सुश्री मोहंती या ओडिशी नृत्य आणि रघुराजपूर, ओडिशा येथील दशभुजा गोटीपुवा नृत्य परिषदेचे कलावंत गोटीपुवा समुह नृत्य सादर करणार आहेत. त्यानंतर आम्ही दुनियेचे राजे ही संगितिका सादर केली जाणार आहे.