बलिप्रतिपदेला बळीपूत्रच सरकारला गाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 07:33 PM2017-09-26T19:33:54+5:302017-09-26T19:40:53+5:30
जळगावात झालेल्या शेतकरी कर्जमुक्ती परिषदेत निर्धार. सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभर शेतकºयांचे मोर्चे काढणार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२६ : कर्जमुक्ती असो की शेतकºयांच्या मालाला हमी भावाचा प्रश्न असो, यात राज्य व केंद्र सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यात सरकारच गुन्हेगार असल्याने बलिप्रतिपदेला (२० आॅक्टोबर रोजी) सरकारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यभरात पोलीस ठाण्यांवर शेतकरी मोर्चे काढण्यात येऊन सरकारला बळीपूत्रच गाडणार असा निर्धार जळगावात करण्यात आला.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावर मंगळवारी दुपारी राज्यस्तरीय शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभाव परिषद झाली. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, डॉ. बाबा आढाव, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, सुकाणू समितीचे समन्वयक अजित नवले, सत्यशोधक संघटनेचे किशोर ढमाले, सुकाणू समिती सदस्या सुशिला मोराणे, अशोक ढवळे, नामदेव गावडे, प्रतिभा शिंदे, एस.बी. पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील होते. ढोल, मृदुंग व टाळ हे पारंपारिक वाद्य मान्यवरांच्याहस्ते वाजवून परिषदेला सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रतिभा शिंदे यांनी केले. यात त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन मोदी विसरले. एक चहावाला लाल किल्ल्यावर भाषण देतो, याचा कष्टकºयांना अभिमान वाटला, मात्र आता २०१९ नंतर मोदींना कधीही लाल किल्ल्यावर जाता येणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी या वेळी दिला. सरकार सर्व आश्वासने विसरून चुकीचे निर्णय घेत असल्याने शेतकºयांसह अभियंते, अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करीत आहे. येथे कोणालाच अच्छे दिन नसून तीन वर्षात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या, हेच या सरकारचे फलित असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
कापूस पेरला नाही तर तुम्हाला चड्डीही मिळणार नाही - बच्चू कडू
सुकाणू समितीला मुख्यमंत्री देशद्रोही म्हणतात, मग शेतक:यांबद्दल रावसाहेब दानवे अपशब्द वापरतात तेव्हा तुम्ही कोठे जातात, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. शेतक:यांबद्दल अपशब्द बोलणा:या भाजपा नेत्यांची यादी मोठी असल्याचे सांगून त्यांनी कापूस पेरला नाही तर तुम्हाला चड्डीही मिळणार नाही, असा इशारा सरकारला दिला. या वेळी प्रचंड टाळ्य़ांचा कडकडाट झाला. आमची देशभक्ती पहायची असेल तर तुम्हीही राजीनामा द्या व मीदेखील देतो, मग सीमेवर जाऊन बघू, कोण किती जणांना मारतो, अशा शब्दात आमदार कडू यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले. आम्ही काँग्रेसचेही बाप आहोत, हे तीनच वर्षात या सरकारने दाखवून दिले, असाही टोला कडू यांनी लगावला. धर्म, जात विसरून शेतकरी, कष्टकरी म्हणून एकत्र या व ‘गर्व से कहो हम किसान है’ असे अभिमानाने म्हणा, असे आवाहनही त्यांनी शेतक:यांना केले.